ना. टोपेंकडे रुग्णांच्या संख्ये इतके रेमडीसीविरची विवेक कोल्हेंची मागणी

ना. टोपेंकडे रुग्णांच्या संख्ये इतके रेमडीसीविरची विवेक कोल्हेंची मागणी

Na.Tope Vivek Kolhe’s demand for remedicivir as the number of patients with the cap

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6May 2021, 19:00 :00

 कोपरगाव : रूग्णसंख्येइतके रेमडीसीवीर इंजेक्शन, इतर औषधे, कोविड तपासणी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दयावेत,  रॅपीड टेस्टची मर्यादित वेळ दिवसभर करण्यात यावी,  अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांचेकडे मंत्रालयात भेट घेउन मतदार संघातील कोविड परिस्थितीबाबत चर्चा केली,

निवेदनात म्हटले की, एचआरसीटी स्कोरचे प्रमाण झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे स्कोर वाढत असलेल्या रूग्णांना डाॅक्टर्स कडून रेमडीसीवीर देण्याची मागणी होत आहे. त्याकरीता रूग्णांच्या तुलनेत रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे इतर औषधांचाही  तुटवडा जाणवू लागल्याने याबाबत आपण उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्री कोल्हे यांनी केली. संशयित रूग्ण इतरांच्या संपर्कात येउन हा आजार मोठया प्रमाणात फैलावत आहे. पर्यायाने कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोविड तपासणी किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दयावेत, रॅपिड टेस्टची असलेली मर्यादित वेळ वाढवुन दिवसभर करण्यात यावी, त्यामुळे रूग्णसंख्येला निश्चितच आळा बसेल, हेही श्री कोल्हे यांनी ना.टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page