समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान जगभरातील सहकारी पतसंस्था चळवळीस अनुकरणीय व भूषणावह – इलेनिता सँड्रॉक
The state-of-the-art technology of Samata is exemplary and admirable to the co-operative credit union movement around the world – Eleanita Sandrock
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11May 2021, 18:30 :00
कोपरगाव- समता नागरी सहकारी पतसंस्था ही जगातील सहकारी पतसंस्थांना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी संस्था असून जगभरातील सहकारी पतसंस्था चळवळीचे भूषण असल्याचे उद्गार जागतिक सहकारी पतसंस्था चळवळीचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन असलेल्या असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ACCU) च्या चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसर इलेनिता सँड्रॉक यांनी काढले.
कोपरगाव मुख्यालय असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेचा ३५वा वर्धापन दिन ऑनलाइन पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ACCU या आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था फेडरेशनने प्रत्येक देशातील एक सहकारी पतसंस्था निवडून ‘व्हर्चुअल स्टडी टूर प्रोग्राम’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत जगभरातील १५ विविध देशातील १०० चे वर प्रतिनिधी उपस्थित होते. समताने वापरात आणलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान जगभरातील सहकारी पतसंस्थांना अनुकरणीय असून त्यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला स्थैर्य मिळत आहे. या प्रसंगी बोलतांना समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणले कि, ‘१९८६ साली समता सुरु करतांना लहान व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आम्ही काही मित्र मंडळी एकत्रित आलो. विशेषतः कै.मोहनलाल झंवर, जितुभाई शहा, गुलाबशेठ अग्रवाल, रामचंद्र बागरेचा, अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे आदि मित्रांनी एकत्र येऊन कोपरगावातील पहिली सहकारी पतसंस्था सुरु केली. केवळ ३०० सभासद करून सुरु केलेली समता आज ६०० कोटी रुपयांच्या ठेवी व ६०,००० सभासदांच्या वर जाऊन पोहचली आहे.’ समताने राबविलेली लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाची कल्पना जगभर गौरविली जात आहे. तब्बल ९७.५०% ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत, विक्रमी असे १०० कोटी रुपयांचे सर्वात सुरक्षित सोनेतारण कर्ज पुरवठा समताने केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये समताने एवढे यश कसे मिळविले याबाबत परदेशातील पतसंस्थांकडून विचारणा झाली असता समताचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले कि,‘अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळविण्यासाठी भारतात अतिशय प्रगत तंत्रज्ञान देणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्या असल्यामुळे नेटविन सारख्या जगविख्यात कंपनीच्या माध्यमातून आम्ही हे तंत्रज्ञान हस्तगत केले तसेच ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरायचे याचे यथोचित प्रशिक्षण दिल्याने हे यश आम्ही मिळवू शकलो.’ आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकारी पतसंस्था चळवळ प्रगतीपथावर आहे व या ३२ देशांमध्ये कार्यरत असलेल्या पतसंस्थांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने समताच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दाखल वर्धापन दिनाच्या दिवशीच घेण्यात आल्याने समता परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व्हाऊचरलेस बँकिंग , मोबाईल बँकिंग, ऑनलाइन फोरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, क्यु.आर कोड सिस्टीम, ऑनलाइन रिकव्हरी, क्लाऊड इंटरनेटच्या माध्यमातून समताने बँकांमध्ये देखील नसलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पतसंस्था चळवळीमध्ये आणले आहे. तसेच घरपोहोच बँकिंग सेवा त्याचप्रमाणे सेवानिवृतांना घरपोहोच पेन्शन देण्याची योजना यशस्वीपणे राबवून सेवाव्रत देखील जोपासले आहे. या अत्याधुनिक सेवा, सुविधांमुळे आज ३५ वर्षापूर्वी १० बाय १५ च्या जागेत सुरु असलेली सतत प्रगतीपथावर असेलेली समता पतसंस्था आज जगभरातील पतसंस्थांना मार्गदर्शन करीत आहे.