कोपरगावात आज ११२१ कोरोना रुग्णावर ठिकठिकाणी उपचार सुरू ; तर शनिवारी १०५ कोरोना रूग्ण आढळले

कोपरगावात आज ११२१ कोरोना रुग्णावर ठिकठिकाणी उपचार सुरू ; तर शनिवारी १०५ कोरोना रूग्ण आढळले

1121 corona patients are being treated in Kopargaon today; On Saturday, 105 corona patients were found

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 15May 2021, 18:00 :00

कोपरगाव : शनिवारी (१५) रोजी खाजगी रुग्णालयातील १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर नगर येथे पाठविलेल्या तपासण्यापैकी १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर रॅपिड टेस्ट मध्ये ६१८ जणांपैकी ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण १०५ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आजमितीला कोपरगावात एकून ११२१ कोरोना रुग्णावर ठिकठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

शनिवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८. १८ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २३. ८२ टक्के कोरोनामुळे मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.५२ टक्के इतकी आहे. शनिवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ८१ रुग्णावर उपचार सुरु आहेत. डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

आज पर्यंतचे कोपरगाव कोरोना अपडेट : ४५६७८ स्वॅब तपासणी यात १७२६१ नगर, रॅपिड टेस्ट २८४१७, निगेटिव्ह तर ३४६३१ पॉझिटिव्ह, १०८८२ होते,पैकी ९५९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने १६५ जणांचा मृत्यू, आजमितिला कोपरगाव शहर व तालुक्यात सद्यस्थितीत ११२१ कोरोना बाधित रुग्ण असून ते एस. एस. जी. एम. कॉलेज, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल आत्मा मालिक हॉस्पिटल, कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटर, संजीवनी कोविड सेंटर, गौतम पब्लिक स्कूल कोविड सेंटर, डॉ. मुळे हॉस्पिटल, डॉ. कोठारी हॉस्पिटल, डॉ. अमोल अजमेरे हॉस्पिटल आदी ठिकाणी उपचार घेत आहेत.

तर आज शनिवारी (१५) रोजी सापडलेल्या १०५ पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर संपर्क साधण्यात आला असून त्यांना उद्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल, शनिवारी संपूर्ण कोपरगाव शहर व तालुक्यात ११२१ रुग्ण बाधित आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page