भांडणातुन पत्नीचा खून, आरोपी पतीकडून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, आरोपी फरार 

भांडणातुन पत्नीचा खून, आरोपी पतीकडून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, आरोपी फरार 

Murder of wife from quarrel, attempt to burn body to destroy evidence from accused husband, accused absconding

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16May 2021, 15:00 :00

कोपरगाव : तालुक्यातील मढी खुर्द येथे पती व पत्नी यांच्यात  झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या  डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टनक शस्त्राने मारून जिवे ठार मारल्याची घटना  गुरूवारी (१३) राेजी रात्री ८ वाजेच्या  सुमारास घडली आणि शनिवारी १५ मे  रोजी उघडकीस आली. सुवर्णा विजय ऊर्फ बंडू गवळी असे मृताचे नाव आहे.

पती व पत्नी यांच्यात  झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या  डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टनक शस्त्राने मारून जिवे ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह  काहीतरी ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले व तिच्या मृत शरीरावर नवीन  कपडे घातले व मयताने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द  गावात ही घटना घडली.
त्यानंतर घरात दोघेच नवरा बायको राहत असल्याने आरोपी  विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी रा मढी खुर्द हा फरार झाला.  दोन दिवसानंतर या  घटनेची माहिती  मढी खुर्द  पोलीस पाटील यांनी 
कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना  दिली . सदर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा वगैरे करून  अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला सदर घटनेचा  पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी  तपास केला व तपासाअंती  पोहेकॉ.१९० अमर वैजिनाथ गवसने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.न.व कलम-lफस्ट१५९२०२१   भा द वी कलम  ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. या खुनाचा तपास तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे  स्वतः करीत आहेत.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page