प्राणवायु शिवाय जीवन निरर्थक आहे- सुश्री भारतीताई जाधव

प्राणवायु शिवाय जीवन निरर्थक आहे- सुश्री भारतीताई जाधव

Life is meaningless without oxygen – Ms. Bharatitai Jadhav

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 19May 2021, 18:20 :00

कोपरगाव : सध्याच्या कोरोनात रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे. प्राणवायु शिवाय जीवन निरर्थक आहे, जीवनामध्ये प्राणवायुला किती महत्वाचे स्थान आहे, हे आपल्याला ज्ञात आहेच, तेव्हा इथून बरे व्हा घरी जा आणि प्रत्येकाने दोन वृक्ष लावा मौलिक सल्ला सुश्री भारतीताई जाधव यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेल्या संजीवनी कोविड सेंटरच्या कोरोना रुग्णांना दिला.

सुश्री भारतीताई जाधव म्हणाल्या, संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोल्हे परिवाराने आपला जनसेवेचा वारसा अखंडीत ठेवला आहे. या सेंटरमध्ये येणा-या प्रत्येक रूग्णाला बरे करण्याचा, त्यांचे मानसिक स्वास्थ जपण्यासाठीचे प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. आपण याठिकाणी सकारात्मक भाव ठेवावा. कोरोना हा बरा होणारा आजार असुन कोणीही घाबरण्याचे कारण नाही. यासाठी फक्त नियम पाळण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा, मन प्रसन्न ठेवा, मानसिक हिंमत ठेवा. यातून आपण निश्चितच बाहेर पडू. मी स्वतः कोरोना बाधित झाले होते, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी बरी होउन आज आपल्यापुढे उभी असल्याचे सुश्री जाधव म्हणाल्या. चौकट -कोल्हे परिवाराने रुग्णांसाठी औषधे पोष्टिक आहार मनोरंजन मार्गदर्शनपर व्याख्याने अशा सर्वांगिण प्रयत्नातून रुग्णांचे मनोबल वाढविण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सुश्री भारतीताई जाधव म्हणाल्या

Leave a Reply

You cannot copy content of this page