संभाव्य तिसरी लाट : प्रशासनाला काय उपाययोजना केल्या, शिवसेनेकडून विचारणा 

संभाव्य तिसरी लाट : प्रशासनाला काय उपाययोजना केल्या, शिवसेनेकडून विचारणा 

Possible third wave: What measures were taken by the administration, Shiv Sena asked

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Fri28 May, 2021, 16:00 :00

कोपरगाव : तीसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, या संभाव्य पार्श्वभूमीवर या लाटेचा मुकाबला कसा करायचा, यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या,अशी विचारणा करणारे निवेदन  शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संघटक अस्लम शेख यांनी तहसिलदार योगेश चंद्रे यांना शुक्रवारी (२८मे)रोजी निवेदन दिले.

यावेळी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, कोपरगाव एसटी कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख ईरफान शेख, उपशहरप्रमुख गगन हाडा, अमित भास्कर आदी उपस्थित होते. 

यावेळी अस्लम शेख म्हणाले,रेड झोन वगळता १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असल्याची  माहिती मिळते नगर जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने कोपरगाव येथील लॉक डॉऊन शिथिल करण्यात येईल का ? तसे होणार नसेल तर किमान काही प्रमाणात उपासमार होत असलेल्या लहान व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी तरी  मिळावी तसेच लॉक डाऊन काळात व्यवसाय करण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ची वेळ देण्यात आली आहे ती वेळ बदलून सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे, या मागणीची दखल घेऊन यावरही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.  

यावेळी भरत मोरे म्हणाले,  पावसाळा आला पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या आजारांचा सुळसुळाट होणार आहे त्यात प्रामुख्याने डेंगू सारखा आजार व करोना यांचे लक्षणे  सारखीच असल्याने यांच्या तपासणीची व उपचाराची स्वतंत्र व्यवस्था करावी अन्यथा डेंगू ला कोरोना समजून ग्राहकांची लूट व शारीरिक नुकसान  होण्याबरोबर “दुखणे मांडीला मलम शेंडीला “अशी  गत होऊ नये, याबाबतीत संबंधितांना कडक सूचना देण्यात याव्यात, तसेच पावसाळ्यापूर्वी औषध फवारणी करणे गरजेचे असून  खंदक नाला व गटारी यांची साफसफाई करणे,  तसेच मोकळ्या  व खाजगी प्लॉटमधील  वाढलेले गवत व काटे नगरपालिकेने जेसीबीने तोडण्यात येऊन जागा मालकाकडून त्याची भाडे वसुली करावी अशा सूचना पालिकेला देण्यात याव्यात अशी मागणी भरत मोरे यांनी केली.  

चौकट –

 कोपरगाव  शिवसेनेच्या जनहितासाठीच्या भावना शासन दरबारी मी पोहचवतो असे आश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिले..

Leave a Reply

You cannot copy content of this page