कोपरगाव पिपल्स बँक यावर्षीही सभासदांना चांगला लाभांश देणार- कैलासचंद्र ठोळे
Kopargaon People’s Bank will pay good dividend to its members this year too- Kailash Chandra Thole
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Fri28 May, 2021, 17:00 :00
कोपरगाव : कोपरगाव पिपल्स बँकेची आर्थिक स्थिती संस्थेचे भाग भांडवल पाच कोटी ८९ लाख एकूण ठेवी २६३ कोटी ३३ लाख कर्ज वितरण १३४ कोटी ३२ लाख एकूण गुंतवणूक १५२ कोटी सात लाख तर बँकेस ढोबळ नफा ३ कोटी५७ लाख निव्वळ नफा १ कोटी ५५ लाख ४० हजार रुपये ग्रॉस एनपीए ५.४७ टक्के नेट एनपीए शून्य पॉईंट पंचवीस टक्के इतका आहे. बँकेस सतत ऑडीट वर्ग अ’ मिळालेला आहे. तसेच सभासदांना १५ टक्के लाभांश यापूर्वी देण्यात आलेला आहे या वर्षीही चांगला लाभांश देण्याचा मानस असल्याचे सुतोवाच पिपल्स बँकेचे जेष्ठ संचालक कैलासचंद्र ठोळे यांनी येवला येथे केले. पिपल्स बँकेच्या नवीन सुसज्ज व वातानुकूलित शाखेत बॅंकेचे ज्येष्ठ संचालक उद्योगपती कैलास चंद्र ठोळे यांच्या हस्ते स्थलांतर करण्यात आले .
स्थलांतरप्रसंगी केले.
कोपरगाव पिपल्स या बँकेचे कार्यक्षेत्र आठ जिल्ह्यां मध्ये असून सन २००१ पासून येवले शहरात या बँकेची शाखा आहे.
बँकेचे अध्यक्ष अतुल काले म्हणाले सध्याच्या स्पर्धात्मक युगात बँकेने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्येही बँकेने चांगली वसुली करून ग्रॉस एनपीए कमी राखण्यात यश मिळवले आहे .यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले बँकेचे उपाध्यक्षा सौ प्रतिभा शिलेदार संचालक सर्वश्री डॉ. विजय कोठारी सुनील कंगले धरमचंद बागरेचा कल्पेश शहा राजेंद्र शिंगी सुनील बंब सत्येन मुंदडा हेमंत बोरावके वसंतराव आव्हाड यशवंत आबनावे रवींद्र ठोळे जनरल मॅनेजर दीपक एकबोटे असिस्टंट जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड सीनियर अधिकारी विठ्ठल रोठे स्थानिक सल्लागार सुभाष चंद् छाजेड अनिल मंडलेचा रमेश चंद्र पटेल आदी उपस्थित होते शेवटी शाखाधिकारी राजेंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.