आयटीआयच्या नवीन भव्य इमारतीमध्ये नगरपालिकेने शासकीय कोविड सेंटर उभे करावे- विवेक कोल्हे
The municipality should set up a government coveted center in the new grand building of ITI- Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Thu27 May, 2021, 16:40 :00
कोपरगाव : तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेउन कोटयावधी रूपये खर्चून उभारलेल्या सद्यस्थितीत वापराविना पडून असलेल्या औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) नवीन भव्य इमारतीमध्ये कोपरगाव नगरपालिकेने पुढाकार घेऊन शासकीय कोविड सेंटर उभे करावे अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली, बुधवारी सकाळी (२६मे) रोजी त्यांनी या इमारतीची पहाणी केली.
विवेक कोल्हे म्हणाले, दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजन बेड, औषधे आदी वैदयकिय सुविधा कमी पडल्याने रूग्णांसह नातेवाईकांची मोठया प्रमाणात हाल झाले आहे. वैदयकिय सुविधा अपु-या पडल्यामुळे अनेक रूग्ण या महामारीत दगावले आहे. उपचारादरम्यान पुरेशा वैदयकिय सुविधा मिळाव्या म्हणून शासकीय यंत्रणेबरोबर विविध सामाजिक संस्थांनीही या मध्ये भाग घेतला, त्यामुळे रूग्णसंख्या कमी होण्यास निश्चितच मदत झाली आहे. कोरोना आजाराची संभाव्य तिस-या लाटेविषयी सध्या चर्चा सुरू असुन ही लाट इतर दोनही लाटेपेक्षा भयंकर असल्याचे मत वैदयकिय तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनानेही या संकटाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू केले आहे. या तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना मोठया प्रमाणात बाधा होणार असल्याचे वर्तविले जात आहे. याकरिता कोपरगाव नगरपालिकेने पुढाकार घेउन औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीमध्ये अद्यावत असे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली.