इफ्कोने जगातील पहिले नॅनो यूरिया द्रव बाजारात आणला, -विवेक कोल्हे
IFFCO launches world’s first nano urea liquid, Vivek Kolhe
अर्ध्या लिटरची बाटली १ पोत्याचे काम करणार,A half liter bottle will do the job of 1 bag,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Tue 1June :18.00
कोपरगाव : इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने भारतातील कोट्यावधी शेतक-यांना जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विडऑनलाईन-ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये इफ्कोने प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरुवात करून बाजारात आणले असल्याची माहिती इफ्को जनरल बॉडी सदस्य विवेक कोल्हे यांनी दिली.
अधिक माहिती देताना विवेक कोल्हे म्हणाले, जमिनीत युरियाचा वापर कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाने हे उत्पादन तयार केले गेले आहे.इफ्को ने भारतातील कोट्यावधी शेतक-यांना जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड प्रदान केले आहे. नॅनो यूरियाच्या दीड लिटर (५०. मिली) बाटलीची किंमत २४० / – निश्चित केली गेली आहे. जे सामान्य युरियाच्या बॅगच्या किंमतीपेक्षा १० टक्के कमी आहे. हे द्रव खत एक पोते (४५ किलो) युरिया इतकेच काम करेल. इफ्कोचा दावा आहे की त्याचा वापर केल्यास पिकाच्या उत्पादनात सरासरी ८ टक्क्यांनी वाढ होईल आणि खर्च कमी येईल. “नॅनो यूरिया द्रव कमी आकारामुळे ते खिशातही ठेवता येईल, यामुळे वाहतूक व साठवण खर्चही लक्षणीय कमी होईल.नॅनो यूरिया लिक्विड पिके मजबूत आणि निरोगी बनवते आणि पिकांना पडून जाण्यास प्रतिबंध करते.इफ्को नॅनो यूरियाचे उत्पादन जून २०२१ पर्यंत सुरू होईल आणि लवकरच त्याचे व्यावसायिक पणनही सुरू होईल. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन असे विवेक कोल्हे यांनी केले आहे.
चौकट
ही शेतक-यांसाठी एक उत्तम भेट आहे. याद्वारे युरियाच्या क्षेत्रातही भारत स्वावलंबी होईल. – डॉ. यूएस अवस्थी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, इफ्को