संवत्सरचे कृष्णा काळे यांची नौदलाच्या सबलेफ्टनंट अधिकारीपदी सरळ नियुक्ती

संवत्सरचे कृष्णा काळे यांची नौदलाच्या सबलेफ्टनंट अधिकारीपदी सरळ नियुक्ती

Direct appointment of Krishna Kale as Sub-Lieutenant Officer of the Navy

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Mon 31 May, 2021,17:40 :00

कोपरगाव: संवत्सर येथील कृष्णा सतीश काळे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय नौसेनेमध्ये सबलेफ्टनंट या पदावर सरळ नियुक्ती मिळविली. सदर सबलेफ्टनंट अधिकारीपदी सरळ नियुक्ती झालेले हे तालुक्यातील पहिले अधिकारी ठरले आहे.  सोमय्या कॉलेज चे, प्रा. डॉ. सतीश काळे व सौ.अलका काळे यांचे ते चिरंजीव आहेत.

 कृष्णा काळे यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण महर्षी विद्या मंदिर कोकमठाण येथून पूर्ण केले व दहावीला असताना त्याने औरंगाबाद येथील सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेची (एस. पी. आय.) परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्ण झाल्याने बारावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण तेथेच झाले. ही परीक्षा देतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.) ची परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन बोर्ड (एस. एस. बी) मार्फत त्यांची रितसर निवड झाली. ते २०१७ मध्ये अखिल भारतीय गुणवत्ता यादीत आल्याने यशस्वी झाले व त्यांना राष्ट्रीय नौदल संरक्षण प्रबोधनी इजिमाला, केरळ येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. सदर प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच त्यांनी पुढील चार वर्षात बी. टेक ही अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केली..  कृष्णा काळे यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केल्याबद्दल गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे, सरपंच विवेक परजणे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव. ऍड. संजीव कुलकर्णी व प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व के. जे. सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक इ. सर्वांनी अभिनंदन केले आहे.    

Leave a Reply

You cannot copy content of this page