ग्रामीण भागात शासकीय इमारतींवर विजरोधक यंत्र बसवा- सौ.स्नेहलता कोल्हे

ग्रामीण भागात शासकीय इमारतींवर विजरोधक यंत्र बसवा- सौ.स्नेहलता कोल्हे

Install anti-light devices on government buildings in rural areas – Mrs. Snehalta Kolhe

ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना निवेदन Statement to Rural Development Minister Hasan Mushrif

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Thu 3June :18.20

कोपरगांव : पावसाळ्यात ग्रामीण भागात वीज पडून मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील शासकीय इमारतींवर विज रोधक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सौ.कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शेतात काम करणा-या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस हानी पोहचून कधी-कधी अपंगत्वही येते तर काहींना आपल्या प्राणास मुकावे लागते त्यामुळे शेतकरी व गोर-गरीब कुटुंबातील नागरिकांच्या जीवनमानावर याचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊन कुटुंबाची मोठी हानी होते.

साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला व परतीच्या वेळी वीज पडण्याचे प्रमाण विशेषत: ग्रामीण भागात अधिक असते,वीज पडून अनेक वेळेस जीवीतहानीसह वित्तहानी होते. त्याकरीता ग्रामीण भागातील सर्व शासकीय इमारतींवर तातडीने वीजरोधक यंत्रे बसविण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी सौ.कोल्हे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page