विवाहितेची छळास कंटाळून आत्महत्या ,सासरच्या मंङळीविरोधात तक्रार

विवाहितेची छळास कंटाळून आत्महत्या ,सासरच्या मंङळीविरोधात तक्रार

Suicide due to marital harassment, complaint against father-in-law

 आरोपींना  ४ दिवसांची पोलिस कोठडीAccused remanded in police custody for 4 days

कोपरगाव : फर्निचर व दुकानासाठी दोन लाख रुपयांची केलेली मागणी पूर्ण न केल्यामुळे विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाहेरख्याली पती सागर भिमराज मापारी,सासरा भिमराज लक्ष्मण मापारी, सासू संगीता भिमराज मापारी,दिर विशाल भिमराज मापारी सर्व राहणार पढेगाव तालुका कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३ जून) रोजी सकाळी ७ वा.पूर्वी , पढेगांव गट नंबर २२, विहीरीत पुजा हिचे प्रेत मिळुन आले. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मयत पूजा सागर मापारी,(२१) हिचे २०२० मध्ये सागर मापारी यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर काहि दिवसात पुजाचा पती सागर, सासरा, ,सासू व दार तिच्याकडे फर्निचर व दुकानासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणण्यासाठी छळ करत होते. ती दोन लाखांची मागणी पूर्ण करत नव्हती.याच रागातून पती,सासरा,सासू व दिर वेळोवेळी मयताला शारीरिक व मानसिक त्रास दिला तसेच मयतास आडून पाडून बोलून शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून हुंड्यासाठी छळवणूक केली.मयताचे पती सागर भिमराज मापारी याने विवाह बाह्य संबंध ठेवून मयताचा मानसिक छळ केला म्हणून विरोधात विजय बाळकृष्ण भुजाडे,(४२)गोधेगाव ता. कोपरगाव यांनी तक्रार दिली आहे.याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम गुरनं. व कलम I-१९६/२०२१ भा द वि क ३०४ब, ४९८अ, ३२३,५०४ , ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत. दरम्यान आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (४जुन ) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात जूनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page