पर्यावरण दिनी कोपरगाव मतदारसंघ वृक्षमय करण्याची सुरुवात करणार सौ. स्नेहलता कोल्हे
On Environment Day, Kopargaon constituency will start planting trees. Mrs. Snehalta Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Fir 4June :17.00
कोपरगांव: आज पाच जून पर्यावरण दिनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची सप्त वर्षे पुर्तीनिमित्त कोपरगांव मतदार संघात नैसर्गिक प्राण वायू निर्मितीसाठी वृक्षारोपणांची मोहिम हाती घेण्यांत येणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
स्नेहलता कोल्हे म्हणांल्या की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हितकारी निर्णय घेवुन सुराज्य चालविले त्याची आठवण म्हणून ६ जुन रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा सर्वत्र साजरा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षाच्या कार्यकाळात जनविकासाच्या असंख्य निर्णयाची महत्वकांक्षी अंमलबजावणी करत कोरोना महामारीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. भारतीय जनता पक्षाने शेवटच्या घटकापर्यंतचा जाणिवपुर्वक विचार करून त्यांच्या उत्कर्षासाठी सतत काम सुरू ठेवलेले आहे.त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, वृक्ष संतुलन राखले जावे पर्यावरण जोपासले जावे यासाठी संपुर्ण् कोपरगांव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक गावात वृक्षारोपण मोहिम राबविली जाणार आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून संपूर्ण जगासह राज्यातही कोरोनाने थैमान घातलेले असून कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेक रुग्णांना प्राणवायूची गरज भासली होती त्याचा विचार करुन संपूर्ण मानव जातीने नैसर्गिक संपत्ती जोपासणे गरजेचे असून याकरीता वृक्ष संवर्धन ही काळाची खरी गरज आहे त्यामुळे येणा-या पिढीसाठी आपण निश्चितच योगदान देऊ शकतो या भावनेने उपक्रमामध्ये सर्वांनींच सहभागी व्हावे असे आवाहन सौ.कोल्हे यांनी केले आहे