शिवाजी  महाराज व त्यांचे वंशज  हे सकल मराठा समाजासाठी कायम सर्वोच्च स्थानीच – सुमित कोल्हे

शिवाजी  महाराज व त्यांचे वंशज  हे सकल मराठा समाजासाठी कायम सर्वोच्च स्थानीच – सुमित कोल्हे

Shivaji Maharaj and his descendants are always the highest place for the entire Maratha community – Sumit Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Tue8June :15.00

 कोेपरगांव: आखिल विश्वाचे  अराध्य दैवत छत्रपती शिवाजी  महाराज व त्यांचे वंशज  हे सकल मराठा समाजासाठी सर्वोच्च स्थानी  होते, आहे आणि कायम राहतील. प्रतिपादन युवा नेते व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी केले.

मराठा समाज आरक्षण संदर्भात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (६ जुन) दुर्गदुर्गेश्वर  रायगडावर केलेल्या घोषणेबाबत व त्यांच्या संपुर्ण नियोजनात सकल मराठा समाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यरत राहील व प्रत्येक आंदोलनाला पाठींबा राहील, असेही सुमित कोल्हे यावेळी म्हणाले,

शिवराज्याभिषेक  दिन महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यात  कानाकोप-यात शिवस्वराज्य दिन म्हणुन साजरा झाला. छत्रपतींच्या विचारांचे निस्सिम भक्त व पालन करणारे  सुमित कोल्हे यांनी रविवारी कोपरगांवातील श्री छत्रपती शिवाजी  महाराजांच्या  अश्वारूढ  पुतळ्याास पुष्पहार  अर्पण करून अभिवादन केले. मराठा आरक्षणावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी जाहिर केलेल्याभुमिकेबद्दल त्यांनी आपले विचार मांडले.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष  स्वप्नील निखाडे, माजी उपनगराध्यक्ष योगेश  बागुल,कोपरगाव एस.टी.कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे, मनसेचे अनिल गायकवाड, नगरसेवक जनार्दन कदम, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव, वैभव आढाव, राहुल राजुरकर, सुनिल साळुंके , व इतर मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page