आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  शेतकरी गटांना २५० क्विंटल बियाणांचे वाटप

आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  शेतकरी गटांना २५० क्विंटल बियाणांचे वाटप

Come on. Distribution of 250 quintals of seeds to farmer groups under the guidance of Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Tue8June :17.40

 कोपरगाव : खरीप हंगामासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सोयाबीन, बाजरी, मका, तूर आदि २५० क्विंटल बियाणे आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांना नुकतेच पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने व उपसभापती अर्जुन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकरी गटांना गळीत धान्य अभियान अंतर्गत ४३ गटांना २३६.५० क्विंटल सोयाबीन बियाणे, तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बाजरीसाठी ६ शेतकरी गटांना २.४० क्विंटल, मका ४ शेतकरी गटाला ६.०० क्विंटल, तूर एका शेतकरी गटाला ३.५ क्विंटल बियाणांचे,मका अधिक सोयाबीन २ गटांना ७ क्विंटल असे एकूण जवळपास २५० क्विंटल बियाणे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.                                

 अर्जुनराव काळे म्हणाले की, मागील वर्षी या अभियानाअंतर्गत १०५.०० क्विंटल बियाणांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे त्यामध्ये वाढ होवून २३६.५० क्विंटल सोयाबीन बियाणाचे वाटप करण्यात आले. सोयाबीनला चालू वर्षी उच्चांकी दर मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहे.                     

  यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,  सुधाकरराव रोहोम,  श्रावण आसने, राहुल जगधने, सुधाकर कर्मवीर होन, प्रसाद साबळे, विठ्ठल जावळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, चांगदेव जवने, सौ. माधुरी गावडे, मनोज सोनवणे, पर्यवेक्षक राजेश तुंबारे,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व शेतकरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.         

    चौकट :- खरीप हंगामात सोयाबीन तसेच अन्य बियाणांची बियाणे टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आ. आशुतोष काळे यांनी सूचना  केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६० क्विंटल सोयाबीन बियाणे परमिटवर मिळाले आहे. खाजगी कृषी सेवा केंद्रांकडे देखील बियांण्यांचा साठा उपलब्ध असल्यामुळे बियाणे टंचाई जाणवण्याची शक्यता नाही.परंतु शेतकऱ्यांनी आपल्या कडील घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन व बिज प्रक्रिया करुन पेरणी करीता वापरावे म्हणजे त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल.-तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव.      

   

Leave a Reply

You cannot copy content of this page