पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना शासनाकडून रद्द- आ. आशुतोष काळे
Restructured weather based fruit crop insurance scheme canceled by the government.- MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 17June :16.40
कोपरगाव: पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याची असल्याचे कृषि आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देऊन हि योजना रद्द करावी याबाबत निवेदन देऊन कृषी विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने मागील वर्षी सुरु केलेली पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द केली असल्याची माहिती आ. काळे यांनी दिली .
कोपरगाव विधानसभा मतदार संघात सलग २५ मिमी पेक्षा जास्त पाऊस दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त पडत नाही. तसेच मतदार संघातील हवामान उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असल्याने सलग चार दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आर्द्रता टिकत नाही. त्यामुळे डाळिंब व पेरू या फळ पिकांसाठी मृग बहाराचे हवामान धोके मतदार संघातील शेतकऱ्यांना लागू होत नव्हते. परिणामी फळपिक विमा काढूनही लाभ मिळत नसल्यामुळे नुकसान होत होते. याची दखल घेऊन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची समक्ष भेट घेऊन हि फळपिक विमा योजना मतदार संघातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
कोपरगाव मतदारसंघ हा अवर्षणग्रस्त असून पर्जन्यछायेखालील प्रदेशात येतो त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीला सामारे जातांना फळबागा वाचविणे शेतकऱ्यांपुढे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. हवामानाच्या अशा प्रतिकूल परिस्थितीत फळपिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मदतगार म्हणून महत्वाची भूमिका बजावत असतांना मागील वर्षी ५ जून २०२० रोजी शासनाकडून सुधारित फळबाग पिक विमा योजना ३ वर्षांसाठी जाहीर करण्यात आली होती. या फळबाग पिक विमा योजनेमध्ये प्रमुख फळपिकांच्या धोके प्रमाणकेमध्ये बदल करण्यात आल्यामुळे फळपिक विमा काढूनही अवर्षण परिस्थिती अथवा अतिवृष्टीने फळबागांचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते.





