शासकीय कामात अडथळा; कोपरगावात माजी आमदार संतोष चौधरी यांचा निषेध

शासकीय कामात अडथळा; कोपरगावात माजी आमदार संतोष चौधरी यांचा निषेध 

Obstruction of government work; Former MLA Santosh Chaudhary’s protest in Kopargaon

Rajendara Salkar I वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed16June :18.00

कोपरगाव:  भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व नपा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद होऊन चौधरी यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचा कोपरगांव नगरपरिषदेमध्ये कार्यरत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी यांचेकडून आज निषेध करण्यात आला.

  सोमवारी (१४ जून) रोजी सायंकाळी  
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार  भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी चिद्रवार हे टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबर २०६ सर्वेादय छात्रालयाच्या जागेवरील अवैध कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी तिथे संतोष चौधरी हेही पोहोचले. यावेळी दोघांमध्ये वाद होऊन चौधरी यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचा कोपरगांव नगरपरिषदेमध्ये कार्यरत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी यांचेकडून आज बुधवारी (१६जून) रोजी  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष  विजय वहाडणे यांना या घटनेचे  निवेदन देऊन निषेध करण्यात आला .
माजी आमदार संतोष चौधरी यांना त्वरित अटक करून यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी नाशिक विभाग व अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीचे   तसेच  कोपरगांव नगरपरिषद कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page