शासकीय जागेवरील रहीवाशांचा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार राष्ट्रवादी नगरसेवक यांची माहिती

शासकीय जागेवरील रहीवाशांचा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार राष्ट्रवादी नगरसेवक यांची माहिती

NCP corporator’s information will solve the problem of eviction of residents on government land

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 18June :16.45

 कोपरगाव : शहरातील टाकळी नाका, साईनाथ नगर, सुभाष नगर भाग -१, सुभाषनगर भाग -२, संजयनगर भाग -१, संजयनगर भाग -२, लक्ष्मीनगर , टिळक नगर, गोरोबा नगर, गजानन नगर, महादेव नगर भाग-१, महादेव नगर भाग-२, लिंभारा मैदान, जिजामाता उद्यान, खडकी, गांधी नगर भाग -१, गांधी नगर भाग -२,दत्तनगर, बेट भागातील २० कुटुंब व हनुमान नगर आदी भागात मागील अनेक वर्षापासून हे कुटुंब शासकीय जागेवर राहत आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नातून लक्ष्मीनगरमध्ये शासकीय जागेवर राहत असलेल्या रहिवाशांचा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.तर लक्ष्मीनगर प्रमाणेच शहरातील इतर भागातील शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचा देखील प्रश्न मार्गी लागणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

कोपरगाव शहरातील कुटुंब राहत असलेल्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावाचे उतारे मिळावे हा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व्हे करून, अतिक्रमित जागेची माहिती घेवून हे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले होते. त्या प्रस्तावांची दखल घेऊन शासनाकडून प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहत असणाऱ्या नागरिकांच्या जागेची मोजणी करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page