आशा सेविकांचा’ बेमुदत संप;राज्य सरकारचे अपयश -सौ. स्नेहलता कोल्हे

‘आशा सेविकांचा’ बेमुदत संप;राज्य सरकारचे अपयश -सौ. स्नेहलता कोल्हे

Asha Sevika’s indefinite strike; failure of the state government – Mrs. Snehalta  Kohle

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 18June :17.45

कोपरगाव :करोना संसर्गाच्या काळात शहरी व ग्रामीण भागात दारोदार जाऊन, आरोग्य सर्वेक्षण ते रुग्णांची सेवा करण्याचे काम आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून केले. ख-या अर्थानं त्या कोरोना योध्दया असुन या आशा सेविकांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, ही लांच्छनास्पद बाब असुन हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची घणाघाती टीका भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केली. वेतनवाढीसाठी तसेच इतर मागण्यांसाठी आशा कर्मचारी व गट प्रर्वतक यांनी १५ जून पासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिलांनी आज सौ. कोल्हे यांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या,

सौ. कोल्हे म्हणाल्या, आशा सेविका घरोघरी जाऊन पल्स ऑक्सिमीटर, ताप मोजण्यापासून आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी केल्या आहे. एका आशा सेविकेला किमान ५० घर रोज करावी लागतात. याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून रुग्ण तपासणीत मदत करावी लागते. शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात.या बदल्यात त्यांना केंद्र सरकारकडून करोना भत्ता म्हणून महिन्याला १००० रुपये म्हणजे प्रतिदिन ३५ रुपये दिले जातात. करोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटाइजर आदी मिळाले. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक ठिकाणी काहीच दिले जात नव्हते तर काही ठिकाणी अर्धवट वस्तू देत होते. साधारणपणे ८ ते १२ तास काम करून घेतले जाते. आशा सेविका व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी सरकार काही घेत नाही. त्यांना कोणतेही विमा कवच, आरोग्य संरक्षण नाही. आजारी पडल्यामुळे कामावर आले नाही तर मानधन कापले जाते. सौ. कोल्हे म्हणाल्या, तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही देऊन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रश्नी तोडगा काढून राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या पुर्ण कराव्यात अशी मागणीही सौ कोल्हे यांनी केली आहे. यावेळी उपस्थित आशा सेविकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

चौकट-(आशा सेविका )-

जेंव्हा जेंव्हा शासनाच्या योजना येतात, तेव्हा तेव्हा आम्हांला कामाला जुंपले जाते. या कामाचा किती मोबदला मिळेल हेही सांगितले जात नाही. आमच्याकडून काम करून घेतले जाते. नंतर २-४ महिन्यांनी आम्हांला तुटपुंजे मानधन हातावर ठेवतात.आम्ही काम करायला कधीच नाही म्हणत नाही, वाडया वस्त्यावर फिरून फिरून आमच्या पायाचे तुकडे पडतात. काटेकुटे आम्ही पहात नाही. साप,कुत्रे आडवे आले तरी जीवावर उदार होउन काम करतो.आमच्या इतके प्रामाणिक काम कोणीच करीत नाही. तरीही आमची अवहेलना होत आहे. ताई, आमचा प्रश्न तुम्ही सोडवा या तालुक्यात आम्हांला तुमच्याशिवाय कोणीच वाली नाही.

Leave a Reply

You cannot copy content of this page