कोपरगांव पिपल्स बँकेचे नवे अध्यक्ष सत्येन मुंदडा
Satyen Mundada is the new chairman of Kopargaon People’s Bank
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 19June :15.30
कोपरगांव पिपल्स बॅकेचे नवे अध्यक्ष सत्येन मुंदडा कोपरगांव : कोपरगांव पिपल्स को- ऑपरेटिव्ह बॅकेच्या अध्यक्षपदी सत्येन सुभाष मुंदडा यांची निवड करण्यात आली.
(दि. १८ जून,) रोजी कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहा. निबंधक एन.जी. ठोंबळ यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वरील निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची सुचना राजेंद्र शिंगी यांनी मांडली त्यास रविंद्र ठोळे यांनी अनुमोदन दिले. मा. अध्यक्ष पदाकरीता एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे नामदेव ठोंबळ यांनी जाहिर केले. अध्यक्ष सत्येन मुंदडा हे गत १२ वर्षापासुन बॅकेचे संचालक असुन यापुर्वी त्यांनी व्हा. चेअरमनपदही भुषविलेले आहे. सत्येन मुंदडा हे तरुण तडफदार असुन कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, लायन्स क्लबचे माजी जिल्हा अध्यक्ष, अ.नगर जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असो. चे विदयमान संचालक असुन सामाजीक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. तसेच बॅकेचे माजी चेअरमन रामबिलास मुंदडा यांचे पुतणे आहे. बॅकेचे मावळते अध्यक्ष अतुल काले यांनी सांगीतले मागील वर्षाचे कारकीर्दीत सर्वांनी सहकार्य करुन बॅकेचे मार्च अखेर वसुली चांगल्याप्रकारे होउन एनपीए चे प्रमाण कमी राखण्यात यश आले तसेच लासुर स्टेशन व येवला शाखा नविन सुसज्ज अशा वातानुकुलीत जागेत स्थलांतर, नविन संगणक प्रणाली घेउन ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न तसेच सध्याच्या स्पर्धेच्या काळात कर्जाचे व्याजदर राष्ट्रीयकृत बॅकेचे बरोबरीने ठेवण्याचा प्रयत्न केला यासर्व बाबी करतांना सर्व संचालक, सभासद, सेवक व खातेदारांचे केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. नुतन अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, सर्व संचालकांनी माझेवर विश्वास दाखवुन अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली ती यशस्वीपणे पार पाडुन सध्याच्या स्पर्धेच्या काळात नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन बॅकेचे ग्राहकांना अजुन पारदर्शी सेवा देउन आपल्या सर्वांचे सहकार्याने बॅक प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न राहील. कैलासचंद ठोळे यांनी सध्याचे कोविड परिस्थीतीमुळे बाजारातील मंदीचे वातावरण व त्यामुळे एकुणच बॅकींग क्षेत्रावर मोठा परिणाम यामुळे येणारे आर्थिक वर्ष आव्हानात्मक असुन त्यास नुतन चेअरमन सत्येन मुंदडा हे निश्चीतच यशस्वीपणे पेलुन बॅकेची यशस्वी घौडदौड कायम राहील यात शंका नाही असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी जेष्ठ संचालक सर्वश्री रतनचंद ठोळे, डाॅ. विजय कोठारी, रविंद्र लोहाडे, सुनिल कंगले, धरमचंद बागरेचा, कल्पेश शहा, सुनिल बंब, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, व्हा. चेअरमन सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. प्रभावती पांडे, अँड संजय भोकरे, सेवक संचालक विरेश पैठणकर, अशोक पापडीवाल, जनरल मॅनेजर दिपक एकबोटे, असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड, सिनी. अधिकारी विठ्ठल रोठे व सहकारी अधिकारी रहाणे उपस्थित होते