कोपरगावात विविध उपक्रमांनी शिवसेना वर्धापन दिन साजरा 

कोपरगावात विविध उपक्रमांनी शिवसेना वर्धापन दिन साजरा 

       Shiv Sena anniversary          celebrated with various activities in Kopargaon

फोटो
नर्स व आशा सेविकांना किराणा वस्तूंचे वाटप करताना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 20June :16.23

कोपरगाव : शनिवारी (१९जुन) रोजी  शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन  शहर आणि उपनगरात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठिकठिकाणी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते.

सकाळपासून विविध शाखांमध्ये सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुठे रक्तदान शिबीर,  तर कुठे कोविड योध्यांचा सन्मान,नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप वाटप,५५ किलो साजूक गावरान तुपाचे लाडू  वाटप,  प्रभागात जंतूनाशक औषध फवारणी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या सर्व कार्यक्रमांचे आयोजन नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदर दडियाल,  महिला आघाडी जिल्हा प्रमुख सपना मोरे , युवती सेना अक्षिता आमले, ग्राहक संरक्षण कक्ष, सर्व पदाधिकारी करण्यात आले होते.
या वेळी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, मुकुंद सिनगर, भरत मोरे,  इरफान शेख, अमजद शेख,  बाळासाहेब साळुंखे  विकास शर्मा ,गगन हाडा,आकाश कानडे, निशांत झावरे, रिकेश जाधव, मयूर दळवी, राहुल हंसवाल,  मंगेश देशमुख,अक्षय जगताप, वैभव हलवाई,उमेश छूगाणी, रामदास शिंदे, अनिल चव्हाण, विजय खंडागळे,पंकज मोरे, वैभव गिते, जुबेद अत्तर ,कृष्णा दळवी अमोल देवकर,समाधान कंदे, किरण घेगडमल,संकेत मंडलिक आदीसह  शिवसैनिक  उपस्थित होते .

Leave a Reply

You cannot copy content of this page