परिवर्तन प्रतिष्ठान आयोजित बोटांची जादू कार्यशाळा संपन्न.

परिवर्तन प्रतिष्ठान आयोजित बोटांची जादू कार्यशाळा संपन्न.

Parivaratan Foundation conducts finger magic workshop.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 20June :17.23

कोपरगाव : कोरोनाकाळात मुलांचे भावविश्व बदलले आहे. शाळाही ऑनलाईन, घरी बसूनच खेळायचं अश्या अनेक मर्यादा. परिवर्तन प्रतिष्ठानने ६ ते १५ वयोगटातील मुलांच्या मनातील सृजनशीलतेला वाव मिळावा म्हणून ‘बोटांची जादू’ ही ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली.  हस्तकला आणि चित्रकला अश्या दोन विषयांवरील कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.

पहिली कार्यशाळा १५ मे ते ३० मे कालावधीत पार पडली तर दुसरी १ जून  ते १५ जून ह्या कालावधीत. ह्या कार्यशाळेला मुलांसोबतच त्यांच्या पालकांनी पण चांगला प्रतिसाद दिला. काही पालक म्हणाले की,’ह्या लाॅकडाऊनने मुलांना कोंडल्यासारखे झाले आहे, दिवसभर भुणभुण असायची मुलांची. पण बोटांच्या जादू कार्यशाळेने आमची मुलं दिवसातले काही तास नक्कीच काहीतरी चांगलं करत होती.’  प्रतिष्ठानच्या सभासद आणि कार्यशाळा संचालक मुग्धा घोटणकर म्हणाल्या की,’आम्ही मुलांना शिकवण्याच्या भानगडीतच पडलो नाही. त्यांना त्यांच्या बोटांमधल्या जादूची अनुभूती देणं हेच उद्दिष्ट आम्ही साध्य केलं. घरातल्या उपलब्ध साहित्याचा वापर करून चित्र आणि हस्तकलेचे विविध प्रकार मुलांनी आवडीने आणि समरसून केले.अशी मुलांना आणि पालकांनाही हवीहवीशी वाटणारी कार्यशाळा घेता आल्यामुळे आम्हालाही समाधानाचा आनंद मिळाला.’ कार्यशाळा ऑनलाईन स्वरूपाची असल्यामुळे वेगवेगळ्या गावांवरून मुलांना यात सहभागी होता आलं. सांगली, सातारा, कल्याण, औरंगाबाद, पुणे, नेवासा आणि झाशी, इंदोर याठिकाणांहून मुले सहभागी झाली. मुलांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासासाठी परिवर्तन प्रतिष्ठान असे कार्यक्रम नियमित आयोजित करत असते, अश्या उपक्रमांची माहिती परिवर्तनच्या फेसबुक पेजवर कायमच दिली जाते, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष  रवींद्र करंदीकर ह्यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page