हेड टू टेल शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तनासाठी प्रयत्नशील- आ.आशुतोष काळे

हेड टू टेल शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तनासाठी प्रयत्नशील- आ.आशुतोष काळे

Head to tail farmers trying to rotate at full capacity – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 21June :17.35

कोपरगाव : हेड टू टेल लाभधारक शेतकऱ्यांना एकाचवेळी पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. गोदावरी कालवा नूतनीकरणासाठी ४० कोटी रुपये निधी मंजूर आणला त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला याप्रसंगी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना ते बोलत होते.

आ. काळे म्हणाले की, गोदावरी कालव्यांनी शंभरी ओलांडली आहे. माजी आमदार अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदार संघात कालव्यांची दुरुस्ती केली होती. मात्र मागील पाच वर्षात दुर्दैवाने कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांनी प्रत्येक वर्षी १०० कोटी याप्रमाणे कालव्यांच्या दुरुस्तीसाठी चार वर्षात ४०० कोटी रुपये निधी देण्याचे कबूल केले आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४० कोटी मिळाले असून अजून ४२ कोटी लवकरच मिळणार आहे. एकाच वेळी पूर्ण क्षमतेने हेड टू टेल शेतकऱ्यांना कालव्यांद्वारे पाणी मिळणे सहज शक्य होणार आहे. मी लोकहिताचा विचार करून लोककल्याणासाठी,जनसेवेसाठी मतदार संघाचे विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी चारुदत्त सिनगर,राजेंद्र खिलारी, सुभाष दवंगे, सतीशशेठ कृष्णाणी, उमाकांत बारहाते, जगन्नाथ बागल, नामदेव जाधव, सय्यदबाबा शेख, नवनाथ जाधव, सर्जेराव कदम, रघुनाथ सिनगर, रामदास खडकाळे, अजिनाथ खडकाळे, शिवाजीराव शेळके, भवर गुरुजी, रितेश वल्टे, कैलास सिनगर, सागर खटकाळे, सावळेराम खटकाळे, माधवराव खटकाळे, दत्तूजी कर्डक, गणेश भवर, दिगंबर धुमाळ, संदीप लांडगे, आबासाहेब खटकाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page