संजीवनीचा पॅरासिटामोल औषध  प्रकल्प वर्षभरात मार्गी-विवेक कोल्हे

संजीवनीचा पॅरासिटामोल औषध  प्रकल्प वर्षभरात मार्गी-विवेक कोल्हे

Sanjeevani’s Paracetamol Drug Project Margi-Vivek Kolhe throughout the year

नव्वद सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार Ninety retired workers felicitated

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 21June :17.23

कोेपरगांव: कोरोनाच्या जागतिक महामारीत असंख्य उदयोगांची वाताहात झाली, आर्थीक घडी विस्कटली, कित्येक कारखान्यांना टाळं लागलं, उदयोग बंद पडले की कामगारांचे संसार उघडयावर येतात पण माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेले उदयोग त्याला अपवाद आहे उलट त्यांनी असंख्य संधी शोधायला लावल्या म्हणूनच संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली पॅरासिटामोल औषधी प्रकल्प वर्षभरात उभा राहिल अशी  ग्वाही जिल्हा बॅंकेचे संचालक विवेकदादा कोल्हे यांनी दिली. सेवा, शिक्षण आणि संस्कार या त्रिवेणी संगमातुनच कामगांरांची भरभराट होत असते असेही ते म्हणांले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ९० सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार तज्ञ संचालक विवेक कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक अरूणराव येवले, सोपानराव पानगव्हाणे, ज्ञानेष्वर परजणे, भास्करराव भिंगारे, विलासराव वाबळे, प्रदिप नवले, मनेश गाडे, अशोकराव औताडे, फकिरराव बोरनारे, मच्छिंद्र लोणारी, राजेंद्र कोळपे, वेणुनाथ बोळीज, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, आदिंच्या हस्ते सोमवारी कारखाना कार्यस्थळावर सामाजिक अंतर राखत, कोरोनाचे नियम पाळून सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी कोरोना महाकारीत दिवंगत झालेले संचालक, कामगार, सभासद, आप्तेष्ट यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली.  कामगार नेते मनोहर शिंदे यांनी प्रास्तविकात कोल्हे कारखान्यांच्या प्रगतीचा आढावा दिला. आण्णासाहेब शिंदे व हरिश्चंद्र डुकरे यांनी कामगारांच्यावतींने मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्यांत मानव संसाधन विकास अधिकारी प्रदिप गुरव, मुख्य रसायनतज्ञ विवेक शुक्ला या नव्यांने रूजु झालेल्या अधिका-यांचाही सत्कार करण्यांत आला. विवेक कोल्हे पुढे म्हणांले की, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा साखर कारखानदारीत असलेला अभ्यास आणि भविश्यात संभाव्य निर्माण होणांरे धोके ओळखून काय पावले टाकायची याचे मार्गदर्शन देवुन ज्युस पासून थेट इथेनाॅल निर्माण करणांरा कारखाना म्हणून संजीवनीला राज्यात अग्रभागी आणण्यांत त्याचा सिंहांचा वाटा आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे वयाची नव्वदी पुर्ण झाली तरी ते दररोज कारखान्यांत येवुन आम्हांला मार्गदर्शन करतात., कोपरगांव परिसराचे आणि ग्रामिण अर्थकारणांची कामधेनु असलेल्या संजीवनी व त्यावर अवलंबुन असणां-या कामगारांचे भले व्हावे म्हणून शंकरराव कोल्हे यांनी केलेले काम आणि चालु हंगामात रेकाॅर्डब्रेक गाळप केले याबाबी त्यांना आत्मीक समाधान देतात.  खुली अर्थव्यवस्था आणि स्पर्धात्मक आव्हानास संजीवनीला सिध्द करण्यांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांची दूरदृष्टी  व कामगारांचे योगदान कारणीभूत आहे, सेवानिवृत्तीनंतरही कामगारांनी कार्यरत राहुन समाजाची सेवा करावी असे ते म्हणांले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page