काकडीत दोनशे  वाहनधारकांना   अडीच लाखाची विमा पॉलिसी  मोफत .

काकडीत दोनशे  वाहनधारकांना  अडीच लाखाची विमा पॉलिसी  मोफत .

 Distribution of free insurance policies of Rs. 2.5 lakhs each to 200 vehicle owners.

 कोपरगाव :शरीर ही आपली संपत्ती आहे तीला जपलेच पाहीजे.शरीर संपत्ती पैशाने विकत घेता येत नाही.विमा ही काळाची गरज झाली आहे. काकडीतील २०० वाहनधारकांचा अपघाती विमा काढला हे नक्कीच चांगले काम आहे.जो अडचणीच्या काळात मदतीला येतो त्याच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे राहिले पाहीजे असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

काकडी येथे संजिवनी उद्योगसमुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधुन विमानतळावरील प्रवासी वाहतुक करणा-या २००  चालक व मालकांचा प्रत्येकी अडीच लाखाचा अपघाती विमा  सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ गुंजाळ व मित्रपरिवाराने उतरविला. त्याच्या प्रमाणपत्राचे वाटप व वृक्षारोपन करतांना त्या बोलत होत्या.अध्य़क्षस्थानी सरपंच पुर्वा गुंजाळ होत्या.यावेळी भाजापाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम,बाजार समीतीचे संचालक नानासाहेब  गव्हाणे,युवा मोर्चाचे तालुकाध्य़क्ष विक्रम पाचोरे,कैलास रहाणे,अशोक गव्हाणे,उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे  आदि प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना कोल्हे म्हणाल्या कि,जुन्या नव्याचा मेळ नेहमी घालावाच लागतो.समाजकारणात व राजकारणात युवकांना जेष्ठांनी नेहमीच प्रोत्साहन दिले पाहीजे.सत्ता असो वा नसो समाजसेवेचे काम आमचे अविरत सुरु आहे.शेतक-याचे,दिन दलीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे.सत्तेत नसतानाही आज कार्यकर्ते हक्काने फोन करतात अडलेल कामे सांगतात व ते काम मार्गी लागते तेव्हा होणारा आनंद वेगळा असतो.काम करण्याची इच्छा असावी लागते.पराजयाने थकायचे नसते सतत काम करत राहीले पाहीजे.काम करत असतांना कोण कोणत्या पक्षाचा आहे हे  पहायचा नसते .काम करणा-याला मागे ओढण्यापेक्षा त्याच्या सोबत काम करा यातच फायदा असतो. यावेळी कानिफनाथ गुंजाळ,भिमराज गुंजाळ,चंद्रभान गुंजाळ,विलास डांगे,विजय डांगे,लक्ष्मण शिंदे, वाल्मीक कांडेकर,रोहीदास कांडेकर, ग्रामसेवक बाजीराव बाचकर, बाळासाहेब मोरे, ज्ञानेश्वर सोनवणे,दत्तात्रय गुंजाळ,उषा सोनवणे, विलास सोनवणे,अशोक गुंजाळ,आनंदा डांगे, हैशिराम डांगे,यादव गुंजाळ,प्रविण सोनवणे, बाबासाहेब सोनवणे,दिगंबर कांडेकर,सुनिल कांडेकर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. . 

Leave a Reply

You cannot copy content of this page