कोेरोना रूग्णसेवकांचा संजीवनीच्यावतींने सन्मान-विवेक कोल्हे

कोेरोना रूग्णसेवकांचा संजीवनीच्यावतींने सन्मान-विवेक कोल्हे

Respect to Corona Patients for Resuscitation-Vivek Kohle

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 22June :17.00

 कोेपरगांव : कोरोना दुस-या लाटेत संजीवनी डेडीकेटेड हेल्थ व कोविड सेंटरच्या माध्यमातून वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या सहका-यांनी आरोग्यदुतांचे केले त्या कोरोना रूग्णसेवकांचा संजीवनीच्यावतींने सन्मान करण्यात आला असून सर्वांनी काळजी घेतली तर संभाव्य  तिसरी लाटही समर्थपणे परतवून लावू असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी उदयोग समुहाच्यावतींने गेल्या ५६ दिवसापासून आत्मा मालिक संकुलात सुरू केलेल्या संजीवनी डेडीकेटेड हेल्थ व कोविड सेंटर कार्याचा समारोप सोमवारी करण्यांत आला. यावेळी अहोरा़त्र आरोग्य सेवा देणांरे डाॅ. राजेंद्र वाघाडकर, डाॅ कल्याणी आहेर, डाॅ. मनोज गोळेचा, डाॅ. वैभव कव्हाळे, डाॅ. सुजित सोनवणे, डाॅ. मनोज बत्रा यांच्यासह ब्रदर, सिस्टर, लॅब टेक्नीशियन, रूग्णवाहिका चालक, प्राणवायु नियंत्रक यासह १०० संजीवनी रूग्णसेवकांचा सन्मानचिन्हासह पत्र, शाल देवुन सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे होते.   विवेक कोल्हे पुढे म्हणांले की, कोरोना आपत्तीत संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी डेडीकेटेड व कोविड केअर सेंटर कोपरगांव मतदार संघातील रूग्णांसाठी अल्पावधीतच उभे केले त्यास जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसिलदार योगेश  चंद्रे, डाॅ. कृष्णा फुलसुंदर, कोपरगांव शहर व तालुक्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे संपुर्ण व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, कोपरगांव ग्रामिण रूग्णालय, यांच्यासह सर्व ज्ञात अज्ञात घटकांनी मदत करून जनजागृती केली, डाॅक्टरांनी धाडस दाखवुन उपचारासाठी पुढे आले हे आपण कदापीही विसरू शकणार नाही.  कोपरगांवसह अन्य भागात येथील महिला बचतगटाकरवी तयार केलेले १ लाख मास्क, ५६ हजार कुटूंबांना संजीवनी सॅनिटायझरसह अन्य जीवनावश्यक साहित्य  पुरविले.   कोरोना संकट आणि त्याच्या उपचारासाठी लागणांरी महागडी औषधे, प्राणवायु, रेमिडीसिवर इंजेशन्स आदि उपलब्ध करून रूग्णांच्या अगदी छोटया छोटया गरजाही पुरवुन मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशीक आदि ठिकाणचे तज्ञ डाॅक्टर्स, हाॅस्पीटल्स, सीटी स्कॅन सेंटर्स व त्यांना मदत करणांरा आरोग्यवर्ग आदि घटक शोधुन त्यांचा व्हाॅटसअप ग्रुप तयार करून ज्यांना ज्यांना मदत लागेल ती अहोरात्र देण्यांचा या माध्यमातुन प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या तिस-या संभाव्य लाटेचा इशारा वैद्यकिय तज्ञांनी दिला असून त्याचाही समर्थपणे मुकाबला करण्यांसाठी आपण सज्ज असल्याचे शेवटी विवेक कोल्हे यांनी सांगितले. उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

चौकट- संजीवनीत तयार झालेले सॅनिटायझर थेट मुंबईच्या कोविड सेंटर पर्यंत पोहोचले ही बाब अभिमानाची व गुणवत्तापुर्ण असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page