झाडे लावा, झाडे जगवा- बिपीनदादा कोल्हे
Plant trees, keep trees alive- Bipindada Kohle
संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने वृक्ष लागवड उपक्रमTree planting activities on behalf of Sanjeevani Foundation
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 22June :17.18
कोपरगांव: ‘संपुर्ण जग ग्लोबल वार्मिंगचे चटके सोेसत आहे. सगळीकडेच वृक्षांची कत्तल होवुन काॅक्रिटची जंगले उभी राहत आहे. वृक्षांपासुन आपणास ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजनचे महत्व सर्वांनी कोविड-१९ च्या महामारीत अनुभवले आहेत. जंगल तोडमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे नैसर्गिक संकटे मानवावर कोसळुन अपरीमित हानी होत आहे. यासाठी वसुंधरेचा समतोल राखन्यासाठी प्रत्येकाने झाडे लावुन ती जगवली पाहीजे’, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळातील कोपरगांव साईबाबा काॅर्नर ते कोपरगांव रेल्वे स्टेशन या मंजुर रस्त्याचे काम पुर्णत्वास जात आहे. या रस्त्याच्या मध्यभागी व दोनही कडेला वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी संजीवनी फाऊंडेशनने घेतली आहे. संजीवनी फाऊंडेशनने श्री बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या रस्त्यावरील दुसऱ्या टप्याची वृक्ष लागवड त्यांच्या हस्ते केली. यावेळी बिपीनदादा कोल्हे बोलत होते. सदर प्रसंगी कोविड-१९ ची मार्गदर्शक तत्वे सांभाळुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी व संजीवनी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, जिल्हा बॅन्केचे संचालक व विवेक कोल्हे, उपनगराध्य स्वप्नील निखाडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, वैभव आढाव, रवी रोहमारे, मयुर कांडेकर, बाळासाहेब आढाव, सरपंच भीमा संवत्सरकर, राजु चांडे चंदगव्हान, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांचे प्राचार्य, आदी उपस्थित होते.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी घेतलेला सामाजिक वसा टाकायचा नाही अशी शिकवण दिली आहे. या तत्वानुसार केवळ मतदार संघातच नव्हे तर जेथे जेथे नैसर्गिक संकटे कोसळली, तेथील जनतेच्या मदतीसाठी संजीवनी धावुन गेली आहे. यात किल्लारी गुजरातमधिल भुकंपांचाही समावेश आहे. मतदार संघातही प्रत्येक गोदावरीच्या महापुरात संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी संजीवनी रात्रंदिवस घावली. वृक्ष लागवडीबध्दल ते म्हणाले की अनेक ठिकाणी त्याच खड्याात पुन्हा वृक्ष लागवड करून केवळ दिखाव्यासाठी फोटो सेशन केल्या जाते. परंतु संजीवनीच्या माध्यमातुन जी झाडी लावली, त्यांचे नियमित संगोपनही केल्या जाते. याच रस्त्यावर पहिल्या टप्यात दुभाजकामध्ये लावलेल्या वृक्षांची व फुलझाडांची उत्तम निगा राखुन रस्त्याचे सौंदर्यही वाढवल्याबध्दल त्यांनी संजीवनी फाऊंडेशनचे कौतुक केले. वाढदिवस हे सामाजिक कार्याने व्हावेत, यासाठी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय वस्तुंचे वाटप कार्यकर्ते करीत असतात. अनेक कार्यकर्त्यांच्या घरातील लग्न समारंभात फेटे बांधुन मिरविण्यापेक्षा विधायक कामांना, गरजुंना मदत करण्यात येते. या बध्दल त्यांनी कार्यकरत्यांचे आभार ही मानले. प्रत्येकाने एकतरी झाड लावुन त्याचे संगोपन करावे, अशी आग्रही भुमिका त्यांनी शेवटी मांडली.