हॉस्पिटलओम ॲप आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावेल –आ.आशुतोष काळे
Hospitalom app will play an important role in terms of health – MLA. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 22June :17.41
कोपरगाव : कोरोना बाधित रुग्णांना बाधा झाल्यांनतर योग्य मार्गदर्शन, सुविधा व औषधोपचार मिळाल्यास तो रुग्ण निश्चितपणे बरा होतो. त्यासाठी वेळेत योग्य माहिती उपलब्ध असणे गरजेचे असून अशा प्रकारच्या जीवघेण्या संकटात आरोग्यविषयक अत्यंत सूक्ष्म माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून भविष्यात हॉस्पिटल ओम ॲप महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव मध्ये प्रथमच एमएच ३५७ (MH 357) या कंपनीची स्थापना करून कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधांची उपलब्धता या विषयी सखोल माहिती देणाऱ्या हॉस्पिटलओम या ॲपचा शुभारंभ नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. या ॲपच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटल्सविषयी सर्व माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. ॲपचे निर्माते प्रीतमजी महावीर संघवी यांनी महाराष्ट्रातील सर्व ३५७ तालुक्यांसाठी हे ॲप सुरू करण्याचा संकल्प केला.





