ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत भ्रमणभाष संदेश प्रणाली महत्वाचे कार्य करेल- दत्तात्रेय गोर्डे

ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत भ्रमणभाष संदेश प्रणाली महत्वाचे कार्य करेल- दत्तात्रेय गोर्डे

The mobile messaging system will play an important role in case of emergency in rural areas- Dattatreya Gorde

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 22June :17.54

 कोपरगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत ग्राम पातळीवर ग्राम सुरक्षा यंत्रणेची भ्रमणभाष संदेश प्रणाली कार्यान्वित असेल तर संकट निर्मुलनासाठी महत्वाचे कार्य ठरु शकते.असे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक दत्तात्रेय गोर्डे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित संदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील ५५ गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणाचे प्रशिक्षण संत जनार्दन स्वामी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.संकट काळात स्वतःच्या मोबाईलवरुन सर्व गावकऱ्यांना एकाचवेळी काॅलच्या माध्यमातून सूचना देणे,सावध करणे किंवा मदतीला बोलाविण्यासाठी यंत्रणा आहे. पोलिस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्ते संदर्भात व शरीराविरुध्द होणारे गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी, दरोडा,आग-जळीताच्या घटना,निधन वार्ता, मोकाट जनावरे व पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, लहान मुले हरविणे, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात,वन्य प्राणी हल्ला,पूर,भूकंप, ग्रामसभा, सरकारी योजना, सरकारी सूचना,रेशन वाटप, आदिंसह आपत्कालीन घटनांमध्ये सर्व गावाला एकाच वेळी सूचना देण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक १८०० २७० ३६०० किंवा ९८२२११२२८१ या नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले.तसेच प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांनी आपापल्या गावातील नागरिकांचे मोबाईल नंबर समाविष्ट करुन सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी.असे सांगितले.या वेळी आपत्ती काळात भ्रमणभाष संदेश प्रणालीचा वापर कसा करावा.तसेच संदेश कसा सांगावा.याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.तसेच चलचित्र फित द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, निवासी नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, ईंद्रभान ढोमसे, युवराज गांगवे, सुशांत घोडके, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील,पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष,माजी सैनिक संघटनेचे स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांचे सह ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी तर आभार पंडित कुमार पवार यांनी मानले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, ग्राम सुरक्षा यंत्रणा नोंदणी क्रमांक नोंदणी अधिकारी अशोक हिंगले,गणेश हिंगले,कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो.काॅ.जयदीप गवारे, गोपनीय शाखेचे युवराज खुळे, पोलिस पाटील संजय वाबळे, पंडितकुमार पवार,गणेश ठोंबरे,विजय शेळके,अविनाश भारुड,आकाश जाधव यांचे सह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page