कोेरोना महामारीत योगोपचाराला विषेश महत्व-स्नेहलता कोल्हे

कोेरोना महामारीत योगोपचाराला विषेश महत्व-स्नेहलता

Of particular importance to the Corona epidemic is yoga-Snehalta Kohle

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 23June :13.00

कोेपरगांव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगसाधनेला जागतिक पातळीवर नेउन संयुक्त राष्ट्र संघटनेत २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषीत करण्यांत महत्वाची भूमिका बजावली आज कोरोना विश्व महामारीत याच योगसाधनेला मानसिक स्थिती सदृढ ठेवण्यांत विषेश महत्व असल्याचे प्रतिपादन प्रदेश भाजपाच्या सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोरोना महामारी अजुन आटोक्यात आलेली नाही तेंव्हा नागरिकांनी याबाबतचे सर्व नियम पाळलेच पाहिजे असेही त्या म्हणांल्या.

भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यालयाच्या आवाहनानुसार कोपरगाव विधानसभा मतदार संघात २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यांत आला त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ कुंभारी येथे झाला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पुरातन महादेव मंदिर देवस्थानचे राघवेश्वर महाराज होते.  प्रारंभी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव कदम, राजेंद्र कोळपे, विजय कदम, दिपक चौधरी, सुनिल कदम यांच्यासह कुंभारी पंचक्रोषीतील नागरिकांना सौ. कोल्हे यांनी योगोपचाराचे प्रात्याक्षिके करून दाखविली.

   सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, जागतिक विश्व महामारीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय संयम दाखवुन योगसाधनेतुन या महामारीला कसे दुर ठेवायचे याचे मार्गदर्शन दिले.  सर्वांचे जीवन धावपळीचे आहे त्यात अन्य व्यायामाबरोबरच योगोपचार पध्दती गरज बनली आहे. तेंव्हा सदृढ आरोग्यासाठी योगोपचार सर्वांनी केलाच पाहिजे., भाजपा त्याच्या जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवत आहे. शेवटी विजय कदम यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page