शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी ‘योगा’ आवश्यक – सौ मनाली कोल्हे
Yoga is essential to keep body and mind healthy – Mrs. Manali Kolhe
योग दिन संजीवनी अकॅडमी व इंटरनॅशनल स्कूल Yoga Day Sanjeevani Academy and International School
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 23June :12.30
कोपरगांव: योग हा भावनात्मक समतोल आणि माणसाला अनादी अनंत तत्वाला स्पर्श करीत अध्यात्मिक शक्तीची ओळख करून देणारे शास्त्र आहे. योग हा केवळ व्यायाम प्रकार नसुन जीवन पध्दती आहे. योगाची निर्मीती भारतात झाली असुन योगामुळे शरीर व मन निरोगी राहते. विध्यार्थी जीवनात योग व प्राणायम यांचा सराव सुरू केल्यास निरोगी आणि आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन संजीवनी अकॅडमी (कोपरगांव) व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल (शिर्डी ) च्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनी संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये व्हर्चुअल पध्दतीने संगीतमय योगाचे आयोजन करण्यात आले होते. संजीवनी अकॅडमीतुन सौ. कोल्हे यांनी ऑनलाईन पध्दतीने दोनही स्कूलच्या विद्यार्थ्यांना संदेश दिला. संजीवनी अकॅडमीत काही निवडक विध्यार्थ्यानी तर संजीवनी इंटरनॅशल स्कूलमध्ये प्रसिध्द योग शिक्षक डाॅ. अभिजीत शहा यांनी ऑनलाईन पध्दतीने योगाचे सादरीकरण केले. डाॅ. शहा यांना शिर्डी येथिल प्रसिध्द व्यावसायीक विनोद ज्ञानदेव गोंदकर व त्यांच्या पत्नी रेशमा गोंदकर यांनी साथ दिली. सदर प्रसंगी आंतरराष्ट्रीय योगा सुवर्ण पदक विजेते प्रसाद घयवट यांनीही ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी व पालकांना योगाचे महत्व पटवुन दिले. सौ कोल्हे पुढे म्हणाल्या की कोविड १९ च्या काळात विषाणूंच्या संसर्गापासुन दुर राहण्यासाठी आपले शरीर आपल्याला किती साथ देते हे अनेकांनी अनुभवले आहे. योगाने अनेकांनी कोरोना विषाणुपासुन सोडविले आहे ही वस्तुस्थिती आहे. मनात वेगळ्या विचारांचा कल्लोळ असेल तर आपण कधिच आपल्या कामावर एकाग्र होवु शकत नाही. परंतु योगाभ्यासाने आपण राग, क्रोध, मत्सर, मनात विचारांचा कल्लोळ यावर ताबा मिळवुन मन शांत ठेवुन एकाग्रता वाढवुन हाती घेतलेले काम यशस्वी करून आनंदी जीवन जगू शकतो व कुटूंबातील व्यक्ती तसेच समाजापुढेही एक वेगळा आदर्श घालवुन देवु शकतो. यावेळी संजीवनी अकॅडमी मध्ये प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम तर संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्राचार्या सौ. रितु सरवाई व अकॅडमिक हेड माया फर्नांडीस उपस्थित होत्या.