शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास साधण्याचा प्रयत्न केला-प्रशांत सरोदे

शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास साधण्याचा प्रयत्न केला-प्रशांत सरोदे

Tried to achieve development by coordinating with government officials – Prashant Sarode

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 26June :13:00

कोपरगाव : शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शुक्रवारी (२५जून) रोजी पालिकेतील पदोउन्नती व बद्दली निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले . या कामी मला नगरपरिषदे मधील माझे सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार या सर्वांनी जीव ओतून काम केले त्यामुळेच शक्य झाले. असेही ते म्हणाले,

कोपरगाव नगर परिषदेमध्ये तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण करून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची अमळनेर नगरपरिषद येथे वर्ग ‘अ’ पदी पदोन्नती झाल्याने त्यांची बदली झाली.

नगरपरिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक या सगळ्यांसोबत काम करणे तशी तारेवरची कसरतच होती. परंतु सरोदे यांनी सर्वच पदाधिकारी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष या सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून, कोपरगाव शहर विकासाचा गाडा ३ वर्ष यशस्वी रित्या चालवला.
या तीन वर्षाच्या कार्यकाळात मुख्याधिकारी सरोदे असताना यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विविध अडचणी सोडवून यांना सातवा वेतन आयोग लागू केला. तसेच वारसाहक्काने, शासकीय नियमाप्रमाणे १८ कर्मचाऱ्यांना नगरपरिषद सेवेत सामावून घेतले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे सोबतच शहरांच्या विकासामध्ये देखील त्यांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला. सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या  वॉर्डांमध्ये मागणीप्रमाणे व शासकीय नियमांना धरून शक्य असतील तेवढे विकास कामे पूर्ण केले. मग त्यात गटारी, पेव्हिंग ब्लॉक, रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, विविध भागात लिकेज असलेली पाईपलाईन दुरुस्ती, शहर स्वच्छता, कचरा विलगीकरण, यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये कोपरगाव नगरपरिषद देशातील पश्चिम विभागातून १८वे मानांकन प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी मुख्याधिकारी सरोदे यांच्या सोबत उत्कृष्ट असा कार्यकाळ गेल्याची खंत बोलताना उपमुख्यअधिकारी सुनील गोरडे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, डॉ.गायत्री कांडेकर यांनी व्यक्त केली. प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, नगरसेवक सर्व पक्षाचे कार्यकर्ते नागरिक, व्यापारी, पत्रकार, कार्यालयातील सर्व सहकारी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महारुद्र गालट यांनी केले. तर आभार तुषार नालकर यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page