ओबीसी आरक्षण : स्नेहलता कोल्हेंचा साई तपोभूमी चौकात दोन तास चक्का जाम,
OBC reservation: Snehalta Kolhen’s two-hour Chakka Jam at Sai Tapobhumi Chowk,
कोपरगाव : ”महाराष्ट्र राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी.. आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे.. ओबीसी आरक्षण संपविणा-या सरकारचा धिक्कार असो… कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… काम बिघाडे या सरकारचा धिक्कार असो… स्नेहलताताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ….ऊठ ओबीसी जागा हो, एकजूट व्हा, संघटित व्हा, अशा घोषणा देत विविध मागण्या करीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी कोपरगाव आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व सर्व सेलच्यावतींने साई तपोभूमी चौक येथे भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.ओबीसी संघटना व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. नगर मनमाड जलदगती मार्गावर साईबाबा मंदिर जवळ साई तपोभूमी चौकात स्नेहलता कोल्हे यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आक्रमक आंदोलकांनी रस्ता अडविल्याने वाहतूक खोळंबली होती.
प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यांत आले. भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. गटनेते रविंद्र पाठक व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडी जुगाड बिघाडीचे सरकार असुन बाराबलुतेदारांना ते पुर्णपणे विसरले, इतरमागासवर्गीय ओबींसींचे राजकीय आरक्षण काढुन घेतले तर जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल, नाकर्त्या शासनाचा आम्ही निषेध करतो, संघर्षाने प्रश्न मांडुन भांडल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही, सत्तेतील मंत्री खुर्च्या वाचविण्यांचे काम करत आहेत. गोरगरीब व ओबीसीविरूध्द होणांरा अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही. ओबीसींची मते पाहिजेत मात्र त्यांच्यावरील अन्यायाबाबत मात्र मौन धारण करणारे हे ‘सरकार महिन्यांपासून वेळकाढू पणा करतेय, आधी ओबीसी आरक्षण मगच निवडणुका, आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही” अशी स्पष्ट भूमिका स्नेहलता कोल्हे यांनी घेतली आहे.
यावेळी विवेक कोल्हे म्हणांले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध भागात चक्काजाम आंदोलन घेण्यात येत आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी शासनांने असंख्य चुकीचे निर्णय घेतल्यांने त्याची शिक्षा आपण भोगत आहोत, ओबीसी वर्गाचे आरक्षण काढुन त्यांचेवर अन्याय कराल तर त्याची पहिली ठिणगी कोपरगांवातुन पडेल आणि त्याचा वणवा संपुर्ण महाराष्ट्रभर पसरेल असा इशारा देवुन येथील सत्ताधारी फोटो आणि खोटे सम्राट आमदारांनी कोपरगांव शहरवासियांचे थेट निळवंडेतुन बंद पाईपलाईनद्वारे येणांरे पाणी बंद केले, आणि नागपुर समृध्दी महामार्गाची स्मार्टसिटी घालविण्यांचे पाप केले, त्याची माफी साईबाबा दरबारी मागुन ती पुर्ववत करावी, कुणांलाही खोटे आश्वासने देवुन गाजर दाखविण्यांचे काम बंद करून जनतेला वेडयात व मुर्खात काढुन कोल्हे परिवारावर आसुड ओढुन राजकीय पोळी भाजु नये. रस्तारोको, धरणे, चक्काजाम, जेलभरो आंदोलने हा कोल्हे परिवाराचा पिंड असुन अन्यायाविरूध्द सतत संघर्ष करून न्याय देण्याची आमची परंपरा आहे. मतदार संघात होणां-या विकासकामांसाठी कुणी निधी मिळविला हे त्यांनी जनतेला प्रमाणिकपणे सांगावे असे म्हणत आंबेडकर पुतळयावर जाहिर चर्चेसाठी यावे असे आव्हान विवेक कोल्हे यांनी दिले.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, कोपरगांव शहर व मतदारवासियांवर आलेल्या प्रत्येक संकटात संजीवनीच सर्वप्रथम धावून आली आहे. भाजपाने वाचविलेले ओबीसी आरक्षण लबाडीतुन सत्तेत आलेल्या नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारने घालविले. आयोग निर्मीतीबाबत शासन निष्क्रिय राहिले, त्यामुळे भारतीय जनता पार्टी याविषयाला वाचा फोडत आहे. निर्वाचित निवडणूक निरस्त करुन ओबीसी आरक्षण संपवायचा हा राजकीय डाव आहे. ओबीसी आरक्षणाकडे आघाडी शासनाचा पूर्णपणे कानाकोळा झाला आहे. त्यामुळे सरकारचा धिक्कार करण्याकरीता आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यांत आले.
याप्रसंगी आप्पासाहेब दवंगे, साहेबराव कदम, सोपानराव पानगव्हाणे, मनेष गाडे, विजय आढाव, संभाजी रक्ताटे, विजय वाजे, बबलू वाणी, वैशाली आढाव, फकीरराव बोरणारे , विलास वाबले , राजेंद्र कोळपे , अनुराग येवले, अविनाश पाठक विक्रम पाचोरे शिल्पा रोहमारे, शरद थोरात, महावीर दगडे, विश्वासराव महाले, मनोहर शिंदे, वैभव गिरमे, दिपक गायकवाड, खाटीक समाजाचे अल्ताफ कुरेशी, अन्सारी, कहार समाजाचे अशोक लकारे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, संजीवनी उदयोग समुहाचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन दिपक चौधरी यांनी केले तर भाजपाचे शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी आभार मानले. आरक्षण न मिळाल्यास आमदार घेराव आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला . पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
चौकट-सत्ताधारी आमदार ओबीसी आरक्षण प्रश्नावर मुग गिळुन बसले असून, खुर्च्या वर खुर्च्या मिळविण्यांसाठी त्यांच्या वाऱ्या सुरू आहेत अशी टिप्पणी सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केली.