दीड वर्षात रस्त्यासाठी ८० कोटी दिले, व गोदावरी कालवे दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला-आ. आशुतोष काळे

दीड वर्षात रस्त्यासाठी ८० कोटी दिले, व गोदावरी कालवे दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला-आ. आशुतोष काळे

फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे स्थानिक विकास निधीतुन करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे लोकार्पण करतांना आ. आशुतोष काळे.

 80 crore for roads in a year and a half, and the issue of repair of Godavari canal was solved.-MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 27June :17:30

कोपरगाव :  रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून दीड वर्षात मतदार संघातील रस्त्यांसाठी ८० कोटी निधी उपलब्ध करून गोदावरी कालवे दुरुस्तीचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुख येथे स्थानिक विकास निधीतील करण्यात आलेल्या पाणी पुरवठा विहीर (कदम वस्ती) ते ग्रामा ३० (गिरमे वस्ती) आणि ग्रा.मा.३० (राजगुरु घर) ते पाणी पुरवठा टाकी (चरापर्यंत) रस्त्यांच्या खडीकरण कामाचे लोकार्पण प्रसंगी केले.

यावेळी सौ. पौर्णिमा जगधने,अर्जुनराव काळे,  संभाजीराव काळे, अरुण पानगव्हाणे, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रवींद्र काळे,  व्हा.चेअरमन प्रकाश काळे, उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. आशुतोष काळे म्हणाले की, सेन्ट्रल रोड निधीतून शिर्डी लासलगाव रोडवरील सुरेगाव येथील शनिमंदिर ते धारणगाव पर्यंत नवीन रस्ता करणार असून आवश्यकता असेल त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट पॅचेस देण्यात येणार आहे.  कोपरगाव-कोळपेवाडी रोडवरील माहेगाव देशमुख येथील हनुमान मंदिर ते संजय दाभाडे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होणार आहे. तसेच गणपती मंदिर ते बंधाऱ्यापर्यंत व मळेगाव रोडच्या काही भागाचा समावेश असलेल्या रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. कुंभारी गणपती मंदिर ते हनुमान मंदिर पानगव्हाणे वस्ती या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयाचे टेंडर मंजूर झाले आहे. माहेगाव देशमुख येथे ५ कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित असून त्या कामाचे टेंडर शेवटच्या टप्प्यात आहे त्याचे देखील लवकरच भूमिपूजन करणार आहे. दोन वर्षात रस्त्यांसाठी ८० कोटी उपलब्ध करून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली, काही प्रगतीपथावर असून काही रस्त्यांच्या निधीसाठी अनेक प्रस्तावित मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जिव्हाळ्याचा गोदावरी कालव्याचा प्रश्न मार्गी लावला. ४० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता मिळविली अजून ४४ कोटी या पाच वर्षात मिळवायचे आणि ५५० क्युसेसने चालणारा उजवा कालवा ७५० क्युसेसने चालवायचा व ३०० क्युसेसने चालणारा डावा कालवा ४२५ क्युसेस पर्यंत चालवायचा आहे. यावर्षी पहिल्यांदाच पाणी पट्टीचीपूर्ण रक्कम हि चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आली आहे. असल्याचे आ. काळे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page