क्रेडाई संघटनेचे करोनात रक्तदान शिबीर अनेकांसाठी जीवदान – न्या. सयाजी को-हाळे
CREDAI blood donation camp in Karon saves lives for many – Justice. Sayaji Korhale
रक्तदान श्रेष्ठदान – न्यायधीशासह १४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान Blood Donation Best Donation – 141 blood donors including judges donated blood
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 26June :19:00
कोपरगाव : करोनाच्या महासंकटात संपूर्ण देशासह राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्याप्रमाणात जाणवत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा वेळी कोपरगाव – शिर्डी येथील क्रेडाई संघटनेचे रक्तदान शिबीर शेकडो नागरीकांना जीवदान देण्याचे महान कार्य करीत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा सञ न्यायाधीश सयाजी को-हाळे यांनी व्यक्त केले. रक्तदानापेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही. असे ही ते म्हणाले,
कोपरगाव व शिर्डी येथील बांधकाम व्यवसायीकांची संघटना असलेल्या क्रेडाई या संघटनेच्या वतीने कोपरगाव येथील लायन्स पार्क येथे शनिवारी (२६जुन) रोजी रक्तदान महायज्ञ शिबीराचे आयोजन कोपरगाव संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक , दिनार कुदळे, राजेश ठोळे,उपाध्यक्ष विलास खोंड सचिव चंद्रकांत कौले खजिनदार हिरेन पापडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन कोपरगाव जिल्हा व सञ न्यायालयाचे न्यायमूर्ती सयाजी को-हाळे, न्यायमूर्ती पराग बोधनकर, प्रथम वर्ग न्यायाधीश अभिजीत डोईफोडे, न्यायाधीश विकास मिसाळ, न्यायाधीश रफिक शेख, कोपरगाव वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.जयंत जोशी, ॲड शंतनु धोर्डे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तहसीलदार योगेश चंद्रे, सचिन बोरावके, मनिष फुलफगर,संदीप राहतेकर,अमोल अजमेरे, राजेंद्र शिरोडे,प्रदिप मुंदडा,सिध्देश कपिले, प्रदिप साखरे,अक्षय जोशी,याकुब शेख,किसनराव आसने,राहुल भारती, आनंद अजमेरे,यश लोहाडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. न्या. सयाजी को-हाळे पुढे म्हणाले की,करोनाच्या संकटात काही वर्ग असा आहे की समाजात आलेल्या संकटाची संधी करुन स्वतः चे अर्थार्जन केले आहे तर दुसरा वर्ग असा आहे की, आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून संकटकाळात इतरांची मदत करतात याच दातृत्वाची वृत्ती क्रेडाइच्या सदस्यामध्ये आहे. त्यांची पुनरावृत्ती इतरांनी करावी असे आवाहन न्यायमूर्ती को-हाळे यांनी केले. यावेळी न्यायाधीश पराग बोधनकर म्हणाले की, क्रेडाइच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गरजू नागरीकांना मोठा फायदा होणार आहे. रोगराईच्या संकटात हे रक्तदान शिबिर अतिशय प्रशंसनीय आहे. या शिबीराबद्दल अधिक माहीती देताना क्रेडाइचे अध्यक्ष प्रसाद नाईक म्हणाले की, समाजाला योग्य न्याय देणाऱ्या न्यायमंदीरातील न्यायाधीश या रक्तदान शिबीरात येवून रक्तदान केल्याने सर्वांपुढे हा आदर्श आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वञ रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने गरजू रुग्णांची रक्तासाठी हाल होत आहे. आपल्या एका रक्ताच्या थेंबाने एखाद्या व्यक्तीचे जगण्याचे जीवन ठरत असेल तर आपण या पुण्याच्या कामाची सुरुवात त्वरीत करावी या शुध्द हेतूने क्रेडाइ संघटनेच्या वतीने महायज्ञ रक्तदान शिबीराचे आयोजन केले. कमी कालावधीत ज्यास्त प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला.करोनाच्या महासंकटात रक्ताचा तुटवडा भरुन काढण्याचा हा छोटासा प्रयत्न केला. याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि शेकडो पिशव्या रक्त दानरुपाने जमा झाले. न्यायाधिशांनी रक्तदान करुन नवा आदर्श निर्माण केला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.कोपरगाव -शिर्डी क्रेडाइच्या वतीने आत्तापर्यंत अनेक सामाजीक उपक्रम राबवून माणुसकी जपली आहे. यापुढेही समाजोपयोगी कार्य करीत वृक्षारोपण, शहर सुशोभीकरण आदी उपक्रम राबवणार असल्याची संकल्पना व्यक्त करीत सर्व रक्तदान करणाऱ्या दानशुरांचे अभिनंदन केले. क्रेडाइ संघटनेने समाजाची गरज ओळखुन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन शेकडो गरजुंना रक्त पुरवठा करण्याचा यशस्वी उपक्रम राबविला.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बांधकाम व्यवसायाशी निगडीत सर्व अभियंते , बांधकाम व्यवसायीक, कर्मचारी, बांधकाम कामगार आदींनी परिश्रम घेतले.