सोमय्या कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी विषयाच्या तीन ग्रंथांचे प्रकाशन. -डॉ. यादव 

सोमय्या कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी विषयाच्या तीन ग्रंथांचे प्रकाशन. -डॉ. यादव

Publication of three texts on Microbiology in Somaiya College. Dr. Yadav

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 28June :15:55

कोपरगाव :स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. आकाश पवार व त्यांचे सहकारी डॉ. योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रा. पूजा गख्खड, प्रा. प्रगती शेटे, प्रा.  वृषाली आहेर व  प्रा. प्रियंका शिरसाठ अशा सहा प्राध्यापकांनी मिळून मायक्रोबायोलॉजी विषयाचे तीन संदर्भ ग्रंथांचे लेखन केले असून त्यांचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.  बी. एस. यादव यांनी येथे दिली.

प्रा. आकाश पवार व त्यांच्या पाचही सहकार्यांचे कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव ऍड. संजीव कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.                      

डॉ. यादव पुढे म्हणाले की, या ग्रंथांमध्ये एफ. वाय. बी. एस्सी. च्या अभ्यासक्रमावर आधारित ‘बेसिक टेक्निक्स इन मायक्रोबायोलॉजी’, एस.वाय. बी. एस्सी अभ्यासक्रमाशी निगडित ‘मेडिकल मायक्रोबायोलॉजी अँड इम्म्युनॉलॉजी ‘ आणि टी. वाय. बी. एस्सी अभ्यासक्रमावर आधारित ‘मेडिकल मायक्रोबायोलॉजी’ अशा तीन ग्रंथांचा समावेश आहे. मायक्रोबायोलॉजी विषयात पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण घेणाऱ्या व सेट-नेट परीक्षेची उमेदवारांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून हे ग्रंथ अत्यंत उपयुक्त असल्याचेही प्राचार्य डॉ. यादव म्हणाले. पुणेस्थित इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबियल सायन्सेस या संस्थेमार्फत हे तिन्ही ग्रंथ प्रकशित करण्यात आले आहेत.  या तीनही ग्रंथांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजी विषयाच्या पदवीसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून लवकरच समावेश होणार असल्याची माहिती मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख प्रा. आकाश पवार यांनी दिली.                 

   हे तीनही ग्रंथ अमेझॉन किंडल च्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. योगेश चौधरी यांनी दिली. प्रा. आकाश पवार व डॉ. योगेश चौधरी यांचे यापूर्वी संबंधित विषयात शोधनिबंध देखील प्रकाशित झाले आहेत. सध्या त्यांचे पुढील संशोधन कार्य देखील सुरु आहे. प्रा. पवार व त्यांच्या सहकार्यांना पुढील संशोधनासाठी को.ता. एज्यु. सोसायटी चे सदस्य मा. संदीप रोहमारे व कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page