आधुनिक पिकतंत्रज्ञान अवगत करणे हि काळाची गरज :- आ. आशुतोष काळे
Awareness of modern crop technology is the need of the hour: – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 28June :16:05
कोपरगाव : कृषी संजीवनी तंत्रज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार असले तरी शेतकऱ्यांनी आधुनिक पिक तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी मालेगाव देशमुख येथे कृषी संजीवनी मेळाव्यात केले .
यावेळी सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे, संशोधक पोपटराव खंडागळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडल अधिकारी अविनाश चंदन, संभाजीराव काळे, मधुकर काळे, माहेगाव सोसायटीचे चेअरमन रवींद्र काळे रावसाहेब काळे, रामनाथ जाधव, मच्छिंद्र जाधव, बापूसाहेब जाधव, इंद्रभान पानगव्हाणे, के.पी. रोकडे, कुंभारी चे सरपंच प्रशांत घुले, वसंत घुले, माती पाणी लॅबचे संतोष वाघमारे, अंकुश पवार, साहेब कृषी पर्यवेक्षक पांडुरंग जाधव, कृषी सहाय्यक नीलेश बिबवे, तुषार वसईकर, विजय अहिरे, सुनील सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थितीत होते.
आ.आशुतोष काळे म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून २१ जून ते १ जुलै या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर पिक तंत्रज्ञान पोहोचवून पारंपारिक पद्धतीच्या पुढे जावून आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. निसर्गाचे आपल्या हातात नाही. मात्र योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या व योग्य मार्गदर्शन घेतले तर निश्चितपणे शाश्वत उत्पन्न मिळेल असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले. यावेळी सोयाबीन व ऊस पीक लागवड तंत्रज्ञान यावर संशोधक पी. पी. खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहायक निलेश बिबवे यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवत माहिती दिली. सुत्रसंचलन कृषी सहायक निलेश बिबवे यांनी केले तर मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.