माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण रूग्णालयाची उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता.

माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण रूग्णालयाची उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता.

Success in the pursuit of former MLA Mrs. Snehalta Kolhe; Approval to upgrade rural hospitals to sub-district hospitals.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 28June :17:57

कोपरगाव :शहरात  असलेले ग्रामीण रूग्णालय हे ३० खाटांचे असुन त्यासाठीची अदययावत इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकाम पूर्ण असून या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावे, या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली आहे.

तत्कालीन आरोग्य मंत्री डाॅ. दिपक सावंत यांचेकडे पत्रव्यवहार करून कोपरगाव शहरातील ग्रामीण रूग्णालयची श्रेणी वाढ करून त्याचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यात यावे म्हणून माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी पत्रव्यवहार केला. शहरातील महाराप्ट्र शासनाच्या ६ एकर जमीनीवर ३० खाटांचे शासकीय ग्रामीण रूग्णालय सुरू असुन यासाठी अदयावत इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधून पुर्ण झालेले आहे. परंतु दिवसेदिवस लोकसंख्या वाढीमुळे सदर रूग्णालय कमी पडत असुन रूग्णाची संख्या मोठी असल्याने वैदयकिय सुविधा कमी पडतात, यासाठी या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात यावे अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली होती. सन २०१५ पासुन या कामाचा पाठपुरावा सुरू होता, या पाठपुराव्यादरम्यान सन २०१८ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न क्रमांक १३३८२२ अन्वये महाराप्ट्र विधानसभेच्या सभागृहात प्रष्न उपस्थित करून लक्ष वेधले होते. सन २०११ च्या जनगणनेवर आधारीत आरोग्य संस्थाचा जोड बहृत आराखडा तयार करण्याचे काम आरोग्य सेवा संचनालयस्तरावर सुरू असुन कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी निकषांनुसार जोडबहृत आराखडयामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा संचलनालय, मुंबई यांनी प्रस्तावास मान्यता दिली आहे. कोपरगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण रूग्णालय अपुरे पडत होते, या निर्णयामुळे निष्चितच पुरेशी आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page