आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश: कोपरगावला उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाची मंजुर

आशुतोष काळे यांचे  मोठे यश:

कोपरगावला उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाची मंजुर

Big success for Ashutosh Kale’s follow-up: Health department approves Kopargaon sub-district hospital

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 28June :17:50

 कोपरगाव :  कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून कोपरगावसाठी उपजिल्हा रुग्णालयाला महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. त्या दृष्टीने आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.  आरोग्य विभागाने कोपरगावला उपजिल्हा रुग्णालय मंजूर केल्यामुळे ३० बेडचे असलेले ग्रामीण रुग्णालय १०० बेडचे होईल. नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात  तज्ञ डॉक्टर्स कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. अतिदक्षता विभाग असल्यामुळे अंत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. आ. आशुतोष काळे यांनी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लावून उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळविल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.                      चौकट :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या दृष्टीने प्रयत्न करतांना १०० बेडचेच उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे असा आग्रह लावून धरला होता. उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देतांना ३० बेडवरून ५० बेडची मंजुरी देण्यात येते मात्र केलेल्या पाठपुराव्याची योग्य दखल व केलेल्या आग्रहातून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार व आरोग्य विभागाचे मतदार संघातील जनतेच्या वतीने जाहीर आभार.

कोरोनाच्या संकटात देखील दीडच वर्षात जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता होत असल्याचे आत्मिक समाधान मिळत असून उर्वरित वचनांची पूर्तता करण्यासाठी यापुढेही बांधील आहे. – आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

You cannot copy content of this page