सर्वच घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचला–आ. आशुतोष काळे
The benefits of development have reached all the elements. MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 30June :17:17
कोपरगाव : शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाऊन त्याचा लाभ समाजातील गरजू लाभार्थ्यांना मिळाला असून जि.प. परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वच घटकां पर्यंत विकासाचा लाभ पोहोचला असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोळपेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांअंतर्गत एकूण ३७ लाख ९२ हजार रुपये निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधणे, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खोली बांधणे व नागरी सुविधा केंद्र बांधकाम करणे आदी कामांचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, सुधाकरराव रोहोम, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सुर्यभान कोळपे, डॉ. प्रकाश कोळपे, राधु कोळपे, राहुल रोहमारे, कचरू कोळपे, राहुल जगधने, डॉ. आय.के.सय्यद, ज्ञानेश्वर हाळनोर, ज्ञानेश्वर कोळपे, वसंतराव कोळपे, हौशीराम कोळपे, महेश कोळपे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. आ. काळे म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वच सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणावा एवढीच अपेक्षा होती ती अपेक्षा सर्वच सदस्यांनी पूर्ण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली याचा आनंद वाटतो. यापुढेदेखील लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली. कोळपेवाडीसह इतरही गावांच्या पाणी योजनेचे प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु असून तलावाचे सुशोभिकरन व संरक्षक कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. प्रकाश कोळपे यांनी मानले.यावेळी जी.प.राजेश परजणे, राहुल रोहमारे, डॉ. आय. के.सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.





