संजीवनी पाॅलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासन  अधिकृत प्रवेश  प्रक्रिया केंद्र सुरु -प्राचार्य मिरीकर

संजीवनी पाॅलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासन  अधिकृत प्रवेश  प्रक्रिया केंद्र सुरु -प्राचार्य मिरीकर

Maharashtra Government Official Admission Process Center started in Sanjeevani Polytechnic – Principal Mirikar

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 30June :17:27

कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक मधिल  अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशा  क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित  व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग, इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षणालय, मुंबई (डी.टी.ई.) च्या वतीने संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकमध्ये २०२१-२२ च्या प्रथम  वर्ष  पाॅलिटेक्निक  प्रवेशासाठी दि. ३० जुन पासुन प्रथम वर्ष ऑनलाईन  प्रवेश  सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले असुन विद्यार्थांनी  दि.२३ जुलै पर्यंत ऑनलाईन  रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी  माहिती प्राचार्य ए.आर. मिरीकर  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

 पत्रकात प्रा मिरीकर यांनी सांगीतले आहे की भारतीय नागरीकत्व असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र  राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येणाऱ्या  अंतर्गत गुण मुल्यमापनाच्या आधारे प्रवेश  मिळणार आहे. सध्या इ. १०  वीचे निकाल अद्याप जाहीर झाले नाही. याबाबत ऑनलाईन  नोदणी करते वेळेस फक्त इ. १०  वी बोर्डाकडून प्राप्त झालेला आसन क्रमांक द्यायचा . शासनाने इ. ११ वी प्रवेशासाठी सीईटी (सामुहीक प्रवेश  पात्रता चाचणी) अनिवार्य केलेली आहे. मात्र पाॅलीटेक्निक प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील  माणसिक तणाव राहीलेला नाही.           पाॅलीटेक्निक प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी येथिल सुविधा केंद्राच्या मार्फत संजीवनीसह  महाराष्ट्रात  कोठेही प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांना  या  केंद्रामार्फत त्यांचा कल आणि सध्या मागणी असलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी सखोल  मार्गदर्शन  करण्यात येणार आहे. ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना  आता पाॅलिटेक्निक प्रवेश  प्रक्रिया व पदविका अभियांत्रिकी  शिक्षण  पुर्ण केल्यावर भविष्यातील  संधी हे जाणुन घेण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही. या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी संजीवनी सुविधा केंद्रास भेट देवुन ऑनलाईन  प्रवेश  प्रक्रिया पुर्ण करावी, उमेदवारांच्या जाती निहाय संवर्गानुसार आवश्यक  कागदपत्र व इतर माहितीसाठी या केंद्रातुन मार्गदर्शन  करण्यात येणार आहे. तज्ञ प्राद्यापकांची या केंद्रात नेमणुक केली असुन शिष्यवृत्या , शैक्षणिक  कर्ज व त्यासाठी लागणारे कागदपत्र, तसेच शैक्षणिक  प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र या संदर्भात सखोल माहिती येथे मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. मनोज गायकवाड (७७२०९०७८७८) यांच्याशी संपर्क साधावा असे प्रा. मिरीकर यांनी शेवटी सांगीतले आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page