खुशाल कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरू नका, – विरेन बोरावके

खुशाल कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरू नका, – विरेन बोरावके

Make happy puppies but don’t hold the people hostage, – Viren Boravake

सुनिल गंगुले : अजूनही वेळ गेलेली नाही!; ‘त्यांनी’ सत्ताधाऱ्यांना दिला इशारा Sunil Gangule: It’s not too late yet !; ‘They’ warned the authorities

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 3July :15:30

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधा-यांनी जादा इस्टीमेटच्या नावाखाली विकास कामांचे २८ विषय दोनदा नामंजूर केले, नगराध्यक्षांनी नगरपालिका कलम ३०८ (१) खाली जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून मंजुरी मिळवली होती. कामांचा शुभारंभ झाला होता असे असताना आता अचानक उच्च न्यायालयातून या कामाला स्थगिती मिळवली या सत्ताधारी भाजपाच्या कृत्याचा निषेध करून खुशाल कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक विरेन बोरावके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर दोनदा नामंजूर करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचा व  विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य मनातून गेले नसल्यानेच शहर विकासाच्या २८ कामांना  उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविल्याच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकावर अजूनही वेळ गेलेली नाही,असा जोरदार निशाणा साधला आहे.

रस्ते पाणी स्वच्छता यावरून अगोदरच होरपळलेल्या कोपरगावच्या जनतेचा विकास यांना होऊ द्यायचा नाही का ? कोणत्या तोंडाने मते मागणार ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी भाजपाने उच्च न्यायालयातून घेतलेल्या २८ विकास कामांच्या स्थगितीवर उपस्थित केला.

पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणासाठी जनतेला वेठीला धरू नका, त्याची झळ जनतेला बसू देऊ नका असा इशारा शिवसेना शहर प्रमुख कलविन्दरसिंग  दडियाल यांनी आज दिला.

कॉंग्रेसचे तुषार पोटे म्हणाले विकास  कामांना खोडा हे राजकारणातील सुसंस्कृतपणा हरविल्याचे लक्षण आहे. या खेदजनक राजकारणाचा विचार निवडणुकीत नक्कीच होईल निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांची खुली चर्चा व्हावी.

माजी शहर प्रमुख भरत मोरे म्हणाले, नेत्यांना खुष करण्यासाठी विरोध नको, तर प्रसंगी नेत्यालाही विरोध केला पाहिजे स्थगितीच्या विषयावर शिवसेना निषेध करणार नाही की, अल्टिमेटमही देणार नाही,मात्र निवडणुकीत या विरोधाचे माप त्यांच्या पदरात टाकू असा इशारा दिला.

मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांनी पंधरा दिवसात स्थगिती मागे घ्या, अन्यथा मनसे उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी ही श्रेयाची लढाई असल्याची टीका केली.

यावेळी ॲड. विद्यासागर शिंदे  स्थगितीबाबत माहिती देताना म्हणाले १६ फेब्रुवारी २० सर्वसाधारण सभेत २८ विकास कामांबाबतचा ठराव क्रमांक ११ सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर दोनदा नामंजूर केला त्यामुळे नगराध्यक्ष यांनी नगरपालिका कलम ३०८(१) अन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले त्यावर जिल्हाधिकारी यांनी २३ मार्च २१ रोजी सर्व कामांना तांत्रिक मंजुरी दिली होती त्याप्रमाणे सर्व कामांचे शुभारंभ होवून कामाला सुरुवात झाली होती. परंतु सत्ताधारी भाजपच्या वतीने उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली, ही स्थगिती मिळवित असताना त्यांनी न्यायालयासमोर शासन निर्णय १२ जून २०१९ चा हवाला देत नगरपालिका कलम ३०८(१) प्रमाणे मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणे अपेक्षित होते, परंतु ते नगराध्यक्ष यांनी केले अशी एकच बाजू व अर्ध सत्य मांडले व स्थगिती मिळवली असल्याचे सांगितले. याबाबत राष्ट्रवादी लवकरच उच्च न्यायालयात जाणार असून हा प्रश्न वैयक्तिक नसून जनतेचा आहे तसेच राजकारणासाठी जनतेला वेठीस धरणे योग्य नाहीच अशी बाजू मांडून लवकरात लवकर स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ॲड.विद्यासागर शिंदे यांनी यावेळी सांगितले, शेवटी आभार सुनील शिलेदार यांनी मानले.

या पत्रकार परिषदेसाठी गटनेते नगरसेवक वीरेंद्र बोरावके, मंदार पहाडे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, महात्मा गांधी सचिव धरमशेठ बागरेचा ॲड. विद्यासागर शिंदे, नगरसेवक मेहमूद सय्यद, कलविन्दरसिंग दडियाल, भरत मोरे, इरफान शेख, तुषार पोटे, संतोष गंगवाल, अनिल गायकवाड आदिसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page