श्री शारदा इंग्लिश स्कूल येथे जिल्हास्तरीय मराठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
District level Marathi online oratory competition at Shri Sharda English School
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 2July :17:50
कोपरगाव : महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त येथील सोमैय्या विद्याविहार संचालित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जिल्हास्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने दि २२ व २३ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य के. एल. वाकचौरे यांनी दिली.
पाच हजार रुपये, तीन हजार व दोन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक राहणार असून एक हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देखील देण्यात येणार आहे. विद्यार्थाच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यातील कुशल वक्तृत्वाचे गुण जागृत करण्यासाठी तसेच भाषा,साहित्य, समीक्षा,संस्कृती यांचा विकास घडवून एक उत्कृष्ठ वक्ता निर्माण करण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थांना एक सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. दहावी पर्यंतच्या शालेय विद्यार्थांसाठी हि स्पर्धा असून स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थांचा एक संघ असावा. स्पर्धेचे विषय दोन गटात विभागले प्रत्येक शाळेच्या एका विद्यार्थाने अ गटात तर दुसर्याने ब गटातील विषय निवडणे अनिवार्य राहील.प्रत्येक सहभागीला पाच मिनिटांचा अवधी दिला जाणार असून ऑनलाईन स्पर्धेसाठी अंतिम नोंदणी १० जुलै पर्यंत आहे. स्पर्धक शाळेने सुचविलेले असावे. अ गटासाठी वसुधैव कुटुंबकम ,दहशतवाद -वैश्विक शांतलेला लागलेले ग्रहण ,संस्काराने घडतो मानव,कोरोन महामारी आणि बदललेले जग हे विषय राहणार असून ब गटासाठी स्वातंत्र संग्रामाचे महानायक -लोकमान्य टिळक ,वृक्षवल्ली आम्हा सोयरे,मराठी असे आमची मायबोली,गुरु-जीवनाचा शिल्पकार हे विषय असणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुरकणे बी. के. (९९२२३०१६६८)व नन्नवरे एम व्ही (९०११४४७४४५ )यांच्याशी संपर्क साधावा अथवा principal.sharda@somaiya. edu या मेलवर आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views:
483





