‘प्रसिध्दी, माध्यमातूनच आमदाराचे कार्यालय सुरू; दत्ता कालेंची खोचक टीका
MLA’s office started through publicity; Criticism of Datta Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 4July :12:20
कोपरगाव : कोपरगांव ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतरावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता यावरून कोपरगाव भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आमदारांवर निशाणा साधला आहे.मतदार संघात पहिल्यांदाच गेली दिड वर्षे ‘प्रसिध्दी, माध्यमातूनच आ. आशुतोष काळे यांचे कार्यालय सुरू असल्याची खोचक टीका दत्ता काले यांनी केली आहे.
दत्ता काले म्हणाले, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे याबाबत सन २०१५ पासुन तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे पत्रव्यवहार करुन व पाठपुरावा करुन सन २०१८ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विषयावर प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधले होते. त्याची दखल घेवून तत्कालीन सरकारने सन २०११ च्या जनगणनेवर आधारीत निकषांनुसार जोडबहुत आराखाड्यामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे
कळविले होते. त्यानुसार आरोग्य सेवा संचालनालयाने प्रस्तावास त्याचवेळेस मान्यता दिली होती. याचाच साधासोपा अर्थ असा आहे की, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे उपजिल्हा रुग्णालय मंजुर झालेले आहे, अशी माहिती काले यांनी दिली.
पत्रकात काले यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्याची झालेली बिकट आर्थिक परिस्थीती बघता राज्य सरकारने असा अध्यादेश काढला होता की, राज्यातील कोणत्याही नविन योजनांचे वा नविन कामाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करु नये, असे असतांना आमदार साहेब आपण सांगता ३० सप्टेंबर २०२० रोजी आपण दिलेल्या प्रस्तावामुळे ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले आहे, हे कसे काय शक्य आहे ? आपण फक्त हेच एकमेव पत्र याकामासाठी दिलेले दिसते या पत्रा व्यतिरीक्त आपण याकामासाठी दुसरा कोणताही पाठपुरावा केल्याचे दिसुन येत नाही. आपण पत्रकारांना दाखविलेले पत्र आज आपण आमदार असल्यामुळे आपल्याला आलेले आहे. याचा अर्थ ते काम आपण केले असा होत नाही, असे असताना आमदार साहेब आपण पत्रकारांना अर्धवट माहिती देवुन कोपरगांवच्या जनतेची दिशा भुल करीत असल्याचा आरोपही काले यांनी पत्रकातून केला आहे .
चौकट
गेले दीड वर्ष आमदारांचे विचार, त्यांची भुमिका जनतेला फक्त सोशलमिडीया, वर्तमान पत्रातील बातम्यातून समजत होती. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले आणि त्यांनी मौन सोडलं, आणि ते बोलले पत्राने नव्हे तर पाठपुराव्यामुळे कामे होतात हे मात्र आमदार साहेब आपण खरं बोलंलात,- भाजपचे शहर अध्यक्ष दत्ता काले





