संजीवनीला बेस्ट अप्लिकेशन अँड युझेस ऑफ रिन्युवेबल एनर्जी चा पुरस्कार- अमित कोल्हे 

संजीवनीला बेस्ट अप्लिकेशन अँड युझेस ऑफ रिन्युवेबल एनर्जी चा पुरस्कार- अमित कोल्हे

Sanjeevani wins Best Application and Uses of Renewable Energy Award – Amit Kolhe

भारतातुन संजीवनी ही एकमेव शैक्षणिक संस्था ठरली पुरस्काराची मानकरी Sanjeevani was the only educational institution from India to receive the award

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 4July :18:00

कोपरगांव: ऊद्योग क्षेत्राशी निगडीत काॅन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या संस्थेने ‘ नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल काॅम्पीटिशन २०२१’ या स्पर्धे अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला उर्जा क्षेत्रात नियोजन बध्द व कार्यक्षम वापराबध्दल ‘ बेस्ट अप्लिकेशन अँड युझेस ऑफ रिन्युवेबल एनर्जी ’ हा पुरस्कार देवुन देश पातळीवरील प्रथम पुरस्काराने गौरविले. असल्याची माहिती इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.

संजीवनी ही शैक्षणिक संस्था असुनही उर्जा क्षेत्रात भारतातील नामांकित कंपन्यामधुन एसएमई वर्गवारीतुन प्रथम पुरस्कार प्राप्त केला, ऊर्जेशी निगडीत विविध स्पर्धांमध्ये यश मिळविण्याचे संजीवनीचे हे चौथे वर्ष आहे, असे अमित कोल्हे यांनी सांगितले.

अमित कोल्हे म्हणाले,  नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल काॅम्पीटिशन २०२१’ अंतर्गत देशातील  एसएमई   च्या वर्गवारीतुन संजीवनीसह देशातील नामंकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये उर्जा क्षेत्राशी  निगडीत अपारंपारीक उर्जा, पारंपारीक उर्जेतुन होणारे प्रदुषन थांबविण्यासाठीच्या उपाय योजना, इतर प्रकारच्या उर्जांचे संवर्धन आणि वापर अशा  अनेक बाबींवरपुराव्यासह संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मधिल डीन, आर अँड डी चे प्रमुख डाॅ. आर. ए. कापगते यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे संजीवनीच्या उर्जेशी निगडीत प्रत्यक्षात वापरत असलेल्या विविध उपक्रमांविषयी सादरीकरण केले.

सादरीकरणात संजीवनीच्या वतीने संजीवनीमध्ये उभारलेल्या ५०० किलोवॅटचा सोलर वीज प्रकल्प, त्यामुळे वर्षभरात टळणारे विषारी  वायुंचे उत्सर्जन, अनेक कारणांवरून हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, त्यावर प्रतिकार म्हणुन हवेत ऑक्सिजन  सोडण्यासाठी कॅम्पसमध्ये झाडी लावुन त्यांचे संवर्धन व दरवर्षी  नवीन वृक्षांची लागवड, सांडपाण्याच्या शुध्दीकरणासाठीचा प्लॅन्ट व त्या पाण्याचा वृक्षांसाठी पुनरवापर, मेस व कॅन्टीन मधिल वेस्ट फुडचा व झाडपाल्यांपासुनचे खत व त्याचे वृक्षांसाठी वापर, सभोवलताच्या परींसरांमधुन विध्यार्थ्यांनी  वैयक्तिक वाहनांवर येण्याऐवजी त्यांना बसेसची सोय करणे व त्यामुळे वाचलेले विषारी  वायु उत्सर्जन, कॅम्पस व सभोवतालच्या कामांसाठी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करणे, इत्यादी बाबींची माहिती देण्यात आली. रस्त्यांवर डीझेल व पेट्रोलवर धावणारी वाहने व कारखान्यांच्या धुराड्यातून  होणारेे विषारी  वायु उत्सर्जन, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास  होत आहे. मात्र या विषारी  वायु उत्सर्जनाची भरपाई करण्यासाठी ऑक्सिजन  हवेत सोडला गेला पाहीजे. म्हणुन संस्थेने केवळ कॅम्पस मध्येच झाडी लावली नाही तर संस्थेचे विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांचे पुढाकाराने  वेगवेगळ्या  रस्त्यांच्या कडेला देखिल झाडी लावुन त्यांचे संगोपन केले आहे. या सर्व बाबींची दखल घेवुन सीआयआय ने घेतलेल्या ‘ नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल काॅम्पीटिशन  २०२१ ’ या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला प्रथम   पुरस्काराने सन्माणित केले. या सन्मानाणे संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.या यशाबध्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले तसेच डाॅ. कापगते यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कारही केला. 

या स्पर्धेत इतर वर्गवारीमधुन अशोक लेलॅन्ड लिमीटेड, टीसीएस, जेके टायर, सिग्मा इलेक्ट्रिक, इंडियन ऑईल कार्पोरेशन, जींदल स्टेनलेस, अपोलो टायर्स, बजाज ऑटो , हिंदुस्थान युनिलिव्हर, अशा कंपन्यांनाही पुरस्कार मिळाले. असे त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page