गोदावरी कालव्यासाठी आणखी १५ कोटींचा निधी मंजूर- आ. आशुतोष काळे
Another Rs 15 crore sanctioned for Godavari canal – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 6July :15:30
कोपरगाव: शंभरी पार केलेल्या गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या दुरुस्तीसाठी ना. जयंत पाटील यांच्याकडून ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यामुळे दुरुस्तीसाठी आता ५५ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत आ. काळे म्हणाले, गोदावरी कालव्यांची दुरुस्ती हा मतदार संघातील ऐरणीचा विषय होता. गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर हजारो हेक्टर शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे देखील निधीची आग्रही मागणी केली होती. परिणामत: मागील तीन महिन्याच्या कालावाधीत ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते तर आज पुन्हा नव्याने १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, यापुढेही आणखी निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले आहे.





