निळवंडेचे पाणी आणि स्मार्ट सिटी कामांमध्ये खोळंबा आणणार्यांना ते पाप फेडावेच लागेल – राजेंद्र सोनवणे
Those who obstruct Nilwande water and smart city works will have to pay for it – Rajendra Sonawane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 6July :16:00
कोपरगाव : कोपरगावात ४९ कोटीचा निधी दिल्यावर सुद्धा स्वच्छ दिवसाआड पाणी पिण्यास मिळत नाही, आम्ही पाच नंबर तळ्यासाठी वाढीव पाण्याच्या मागणीला एकमताने मंजुरी दिली पण काय ? मागणी करून साठवण तलावासाठी वाढीव पाणी मिळत नाही असे असताना फुकट मिळणाऱ्या निळवंडे च्या पाण्याला विरोध का केला ? , वकील कोणी दिला, ग्रामस्थांना दिशाभूल करत कोणी भडकविले, नागपूर मुंबई समृद्धी मार्गावर तालुक्यात होणार्या स्मार्ट सिटीला कोणी विरोध करून निळवंडेचे पाणी आणि स्मार्ट सिटी कामांमध्ये खोळंबा आणणार्यांना ते पाप फेडावेच लागेल असा सणसणीत इशारा माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला .
आठ कोटीच्या २८ कामांचा खेळ रंगला असून आमची कामाला नाही तर कामातील भ्रष्टाचाराला स्थगिती आहे. यांना सत्ता दिली पण सत्तेचा उपयोग केवळ अर्थ कारणांसाठीच केला, साई तपोभुमी अण्णाभाऊ साठे पुतळा हा रस्ता चांगला असताना यावर डांबराचा एक बी. बी. एम. चा थर दिला असता तरीही सात आठ लाखांत तो मजबूत रस्ता झाला असता परंतु कारण नसताना त्यावर दहा पट जादा खर्च केला जात आहे, तर अवघा ४ मिटरचा ६५ लाखात होणारा एस.जी विद्यालयाचा रस्ता गरज नसताना अतिरिक्त कामे टाकून पावणेदोन कोटीवर कोणी नेऊन ठेवला, असा घणाघाती आरोप करत सोनवणे यांनी ज्या धारणगाव रस्ता व इंदिरा पथची गरज असताना व आम्ही मागणी करूनही का केला नाही ? असा सवाल सोनवणे यांनी केला.
सोनवणे म्हणाले विषय क्रमांक ११ या २८ कामांपैकी सहा ते सात कामावर सर्वसाधारण सभेमध्ये जादाच्या अंदाजपत्रकामुळे आक्षेप घेतला दोन वेळा कणखरपणे त्यांच्या चुकीच्या कामांना विरोध करत नामंजूर केला. पण ३०८ कलमान्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितल्यानंतर तिथे सुद्धा जिल्हाधिकारी यांनीही विषय ११ तहकूब केला. तरीही अट्टाहास करून कामे सुरू केली. करदात्यांच्या पैशाची लूट होऊ नये या दायित्वातूनच उच्च न्यायालयात गेलो,असा खुलासा सोनवणे यांनी केला.
याप्रसंगी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.





