विकास कामाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा वास आल्यानेच विरोध केला – रवींद्र पाठक

विकास कामाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा वास आल्यानेच विरोध केला – रवींद्र पाठक

Opposed because of the smell of corruption in the name of development work – Ravindra Pathak

ठळक मुद्दे
कोटींवधीच्या भ्रष्टाचाराला मुख्याधिका-यांची मूकसमंती; भाजप-सेना नगरसेवकांचा आरोप

ठळक मुद्दे

नगराध्यक्ष व राष्ट्रवादीकडून विकास कामाच्या नावाखाली २८ कामांचा फार्स ; ‘अभी नही, तो कभी नही’ याप्रमाणे  करदात्यांच्या पैशांची लूट

कोपरगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली, तरीही राष्ट्रवादीच्या संगनमताने वहाडणे यांनी रस्त्यांची कामे सुरू करण्याचा फार्स केला तिथे भ्रष्टाचाराचा वास आल्यानेच विरोध केला, व विकासाच्या नावाखाली नगराध्यक्ष व राष्ट्रवादीकडून करदात्यांच्या पैशांची होणारी लूट थांबविण्यासाठी न्यायालयात जावे लागले, अशी माहितीही गटनेते रवींद्र पाठक यांनी आज सोमवारी (५जून) पत्रकार परिषदेत दिली.

 

रविंद्र पाठक म्हणाले, जनतेने मताधिक्याने निवडून दिले समाज सेवक हजारे यांच्या साक्षीने मोदी मंचच्या विजय  वहाडणे यांना साडेतीन वर्ष एकमतांने सहकार्य केले, सर्व विषय मंजूर केले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तीनशे वीस कोटी रुपये तालुक्यासाठी आणले पालिकेलाही बराच निधी दिला,मात्र वहाडणे यांनी कायम माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा तिरस्कारच केला, वहाडणे यांना साडेचार वर्षात विस्थापितांचा प्रश्‍न सोडविता आला नाही की,  शहर वासियांना दिवसाआड पाणी देता आले नाही, बिपीनदादांनी आणलेल्या ४२ कोटी योजनेची ट्रायल घेतल्याशिवाय ठेकेदाराला पैसे देऊ नका असे सांगूनही तीन साडेतीन कोटी रुपये त्यांनी परस्पर दिले, सेक्सी आम्ही नगरसेवक आहोत आम्हालाही जनतेचे प्रश्न समजतात पण जर कुठे जनतेच्या पैशाची लूट होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्हाला काळे फासण्याचा विचारही मनात आणू नका आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकच आहोत काळे कसे व कोणाला कधी फासायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे असा गर्भित इशाराही त्यांनी शेवटी दिला. यावेळी पराग संधान म्हणाले, फेर इस्टिमेटमध्ये पालिकेचा वेळ व पैसा वाया जाणार असल्याचा मुख्याधिका-यांचा बनाव; गरज नसलेली वाढीव कामे वगळून रस्ते विकासाच्या आठ कोटींच्या कामांचे दर कमी झाले पाहिजे होते. री इस्टिमेट करण्यात पालिकेचा वेळ व पैसा वाया जाणार असून पालिकेची ती क्षमता नसल्याचा बनाव मुख्याधिकारी यांनी केला.अंदाजे साडेतीन कोटींची बचत अपेक्षित असताना री इस्टिमेट न करता काही लाख रुपयांची बचत केली हे मुख्याधिकारी यांनी सांगणे लज्जास्पद असून उर्वरित तीन-साडेतीन कोटींचा भ्रष्टाचार काही करुन होणारच आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारात आपण समाविष्ट आहोत, हेच एक प्रकारे ते मान्य करताहेत” पराग संधान पुढे म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या स्थगिती नंतर चार महिन्यांनी अचानक ११ वर्क ऑर्डर काढून प्रचंड प्रेशर खाली मुख्याधिकार्‍यांनी जाताजाता केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची भाजप-सेनेची मागणी,  असून याकामी मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा  इशाराही त्यांनी दिला, तसेच भर पावसात गोदाम गल्ली व पालखी रस्ता या कामांची चौकशी करणार रस्त्यांच्या उद्घाटनासाठी प्रत्येक डिजिटल फलकासाठी प्रत्येकी केलेल्या सतरा हजार रुपये खर्च केल्याची चौकशी करणार, गरज नसलेल्या रस्त्यातील पैसा वाचवा व तो सत्कारणी लावून इंदिरा पथ व छत्रपती संभाजी चौक ते आंबेडकर पुतळा धारणगाव रस्ता करण्याची आमची मागणी धुडकावून का लावली असा सवाल करून मुख्याधिकारी हे नगराध्यक्ष व राष्ट्रवादीची वकिली करतायेत. याचा अर्थ पालिकेतील गैरकारभाराला मुख्याधिकारी यांची मूकसंमती असल्याचे उघड गुपित आहे. असा आरोप पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत केला.

उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे म्हणाले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना रिंगमध्ये सामावून घेतल्याने नियोजनबद्ध भ्रष्टाचार कसा करावा. याची शिकवण त्यांनी नगराध्यक्ष व विरोधकांना दिली असून ‘अभी नही, तो कभी नही’ याप्रमाणे २८ विकासकामांच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची लूट हाणून पाडली असल्याचा हल्ला करून जाता जाता ३४ नव्या बांधकामांना परवानग्या दिल्या तर ५२ कामांचा पूर्णत्वाचा दाखले देऊन मुख्याधिकार्‍यांनी पराक्रम केल्याचा आरोपही निखाडे यांनी केला .

कैलास जाधव पोल-खोल करताना म्हणाले २८ कामे घरी बोलावून मर्जीतील ठेकेदारांना घरी बोलावून खिरापती प्रमाणे वाटण्यात आली त्यामुळे या कामांमध्ये ठेकेदाराने काही नगरसेवकांना सात सात आठ लाख रुपये कबूल केले होते. पावसाळ्यात डांबरीकरण करू नये असा सरकारचा अध्यादेश असताना सुद्धा पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी त्यांना त्याचा विसर पडला, परंतु जाता जाता पैसे मिळविण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला, पालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या हातात दीड लाखाचे घड्याळ असल्याचा गौप्यस्फोट जाधव यांनी या वेळेस केला.

गटनेते योगेश बागुल यांनी यावेळी बोलताना एखाद्या कामाचे सहा वर्षात तीन पट इस्टिमेट होऊ शकते का स्थळ पाहणी करून इस्टिमेट करा अशी मागणी केली होती यामुळे जिथे भ्रष्टाचार तिथे आम्ही बहुमताचा बहुमताचे बळ वापरणारच असे ठणकावले, आमदार काळे सरळ साधी व्यक्ती असून काहीजण स्व स्वार्थासाठी त्यांच्या नावाला गालबोट लावत असल्याचा आरोपही बागुल यांनी यावेळी केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे यांनी ही विरोधकांवर जोरदार टीका केली. आज (सोमवारी) झालेल्या पत्रकारपरिषदेला भाजपा गटनेते रवींद्र पाठक शिवसेना गटनेते योगेश बागुल उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे अमृत संजीवनी चे उपाध्यक्ष पराग संधान, विजय आढाव, रिपाईचे दिपक गायकवाड संजय सातभाई, कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, विजय वाजे, जनार्धन कदम, वैभव गिरमे, जितेंद्र  रणशूर, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे, कांबळे, जपे,उपस्थित होते.

शेवटी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार व्यक्त करताना विस्थापितांचे पुनर्वसन गाळ्यांचे लिलाव शहराला दिवसाआड नियमित पाणी देण्यात आलेले अपयश, शहरातील अस्वच्छता, घरी बोलावून खिरापती प्रमाणे वाटलेली कामे विकासकामांमध्ये ‘रिंग’ या सर्व बाबींना केवळ भ्रष्ट कारभारात गुंतलेले सर्वच जबाबदार आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page