वाढीव वीज बिलापोटी ग्राहकांची लूट, वसुली व अधिकाऱ्यांची दमबाजी थांबवा माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची मागणी कोपरगाव , वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातले मीटर रीडिंग न घेता सरासरी बिलाच्या नावाखाली चुकीचे व जास्तीचे रीडिंग देवून अव्वाचे सव्वा दिलेली वाढीव बिले त्वरीत रद्द करून देऊन वीज ग्राहकांची लुट, वसुली व अधिकाऱ्यांकडून होणारी दमबाजी थांबवा अशी मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहर अभियंता वीज वितरण कंपनी, यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोपरगाव शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वीज वितरण कंपनीने विद्युत ग्राहकांना सरासरीच्या पद्धतीने भरमसाठ विद्युत देयके देण्यात आलेली आहेत. कोरोना काळातील वीज बिल माफ करणे तर दूरच जाणीवपूर्वक जास्तीची बिले देवून वीज कंपनी नागरिकांच्या खिश्यावर दरोडा टाकत आहे एकीकडे कोरोनामध्ये कोणताही कामधंदा नसताना आलेली बिले द्यावी कशी हा प्रश्न विद्युत ग्राहकांना पडलेला आहे. दुसरी कडे वसुलीच्या नावाखाली वीज कंपनीचे अधिकारी मुदतीत बिले भरा अन्यथा कनेक्शन कट करू अशी दमबाजी करीत आहेत. महावितरण कंपनीला कोटयावधीचा तोटा ग्राहकांकडुन वसुल करीत असल्याचा आरोप करून चुकीची विज बिले तातडीने दुरुस्ती करून दिलेली वाढीव बिले कमी करावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे वीज कंपनीला दिला आहे. . यावेळी भाजपाचे शरद थोरात, साहेबराव रोहोम, कैलास खैरे, वैभव आढाव, दत्ता काले, महावीर दगडे, गोपीनाथ गायकवाड, फिरोज पठाण, दादाभाऊ नाईकवाडे यांच्यासह आदि कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित होते.