ना. हसन मुश्रीफ यांनी कोपरगावच्या घरकुलासाठी “ड” यादी कार्यान्वित करावी – माजी आ. स्नेहलता कोल्हे

ना. हसन मुश्रीफ यांनी कोपरगावच्या घरकुलासाठी “ड” यादी कार्यान्वित करावी – माजी आ. स्नेहलता कोल्हे कोपरगाव “ड” यादीची अंमलबजावणी अद्याप प्रलंबित असुन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना हसन मुश्रीफ यांनी तातडीने कार्यान्वीत करावी अशी मागणी माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. कोपरगाव मतदारसंघातील ग्रामपंचायत स्तरावर “ब” लाभार्थी यादी संपत आलेली आहेत तसेच प्रत्येक गावात “ड” यादीत बेघर, निराधार, अनुसुचित जाती जमाती व इतर घरकुल लाभार्थांच्या याद्या पंचायत समितीकडे सादर केलेल्या असुन लाभासाठी ड यादीची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांच्या कडे पाठपुरवा सुरु होता “ड” यादीची अंमलबजावणी अद्याप प्रलंबित आहे. घरकुलासाठी वंचित असलेल्या घटकांना लाभ मिळावा व ती गेली बरेच वर्षापासुन दुर्लक्षीत किंवा निरक्षर असल्याने त्याना “ब” यादीतील लाभ मिळालेला नाही. तरी अशा दुर्लक्षीत घटकांला हक्काचा निवारा असला पाहिजे म्हणून माझी आग्रही भुमिका आजही आहे. तरी मतदारसंघातील ड घरकुलाच्या यादीची अमंलबजावणी तातडीने करुन वंचितांना न्याय मिळवुन देण्यासाठी नेहमीच शासन स्तरावर प्रयत्नशील राहणार आहे. शासनाने देखील प्रलंबित विषयाकडे दुर्लक्ष न करता तातडीने “ड” यादीची अमलबजावाणी त्वरीत करावी अशी मागणी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page